शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अतिशय प्रतिकूल परिस्थिती असूनही…”, सुप्रिया सूळेंसह इतर राजकीय मंडळींकडून सूरजची वाहवा, म्हणाले, “बारामतीचा रीलस्टार…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 7, 2024 | 9:45 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Boss Marathi 5 Suraj Chavan winner Supriya Sule and Rupali Chakankar praised him

Bigg Boss Marathi 5 चा विजेता झाल्यानंतर सुप्रिया सुळे व रुपाली चाकणकरांकडून सूरज चव्हाणचे कौतुक

Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner : गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवार ६ ऑक्टोबर रोजी पार पडला. महाराष्ट्राची मनं जिंकणारा सूरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा विजेता. खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला गोलीगत सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत राहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्याने स्वतःचं वेगळेपण दाखवल आणि अखेर या शोची ट्रॉफी जिंकत त्याने सर्वांची मनंदेखील जिंकली. ट्रॉफी जिंकताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Boss Marathi 5 Suraj Chavan Winner)

बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकताच सूरजवर राजकीय क्षेत्रातूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत. याबद्दल त्यांनी असं म्हटलं की, “मराठी या वाहीनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शो मध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो”.

View this post on Instagram

A post shared by Supriya Sule (@supriyasule)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : “बोललो होतो ट्रॉफी मीच जिंकणार”, विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणचं वक्तव्य, म्हणाला, “जिद्द होती आणि…”

तसेच रुपाली चाकणकर यांनीही सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत. रुपाली यांनी सूरजचा फोटो पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील बारामतीचा सुरज चव्हाण यंदाच्या मराठी बिग बॉस स्पर्धेचा विजेता ठरला ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. दुनियेच्या झगमगाटात आपल्यातील जिद्दीचा व साधेपणाचा प्रकाश नेहमीच उठून दिसतो हा संदेश सुरजने संपूर्ण महाराष्ट्राला दिला. या उज्वल यशाबद्दल सुरज चव्हाणचे हार्दिक अभिनंदन व यापुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा”. याशिवाय अमोल कोल्हे, अजित पवार, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोळे यांनीही सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rupali Chakankar (@rupali_chakankar)

आणखी वाचा – “सहानूभूती जिंकली? गरीब म्हणून…”, सूरज चव्हाण विजेता झाल्यानंतर प्रेक्षकांसह कलाकारांची नाराजी, म्हणाले, “चुकीचा निर्णय…”

‘बिग बॉस मराठी ५’चा महाविजेता सूरज चव्हाण ठरला असून या शोच्या उपविजेतेपदाचा बहुमान गायक अभिजीत सावंतला मिळाला आहे. सूरजला बिग बॉसच्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे. तसेच केदार शिंदेंनी त्याला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणादेखील केली आहे. दरम्यान, सूरजच्या या विजयावर बिग बॉसच्या घरातील व घराबाहेरील अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Tags: Abhijeet Sawant Bigg Boss Marathi Season 5 WinnerBigg Boss Marathi Season 5 Winner Suraj ChavanSuraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : सूरज चव्हाणचं नशीबच बदललं, लाखो रुपये घेऊन घरी जाणार, दुचाकीही मिळाली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.