गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सहानूभूती जिंकली? गरीब म्हणून…”, सूरज चव्हाण विजेता झाल्यानंतर प्रेक्षकांसह कलाकारांची नाराजी, म्हणाले, “चुकीचा निर्णय…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 6, 2024 | 10:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Winner netizens and actress Mitali Mayekar, Aarti Solanki and Jay Dudhane said that he won out of sympathy.

Bigg Boss Marathi 5 चा विजेता सूरज चव्हाण झाल्यानंतर काही प्रेक्षक कलाकार मंडळी नाखुश असल्याचे पाहायला मिळत आहे.

Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner : बिग बॉस मराठी ५ चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पाडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सगळे मराठी प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहेत, तो क्षण अखेर पार पडला आहे. १०० दिवस चालणारा हा शो यंदा मात्र अवघ्या ७० दिवसांतच संपला. मात्र या ७० दिवसांतही या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. यंदाच्या पर्वाने ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड्स मोडले आणि नॉन-फिक्शनच्या शोमध्येही सर्वोच्च टीआरपी आणत बाजी मारली. अंकिता प्रभू वालावलर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे सहा जण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे अंतिम दावेदार बनले. या सहा जणांनीदेखील एकमेकांना टक्कर देत आपला इथपर्यंतचा पल्ला गाठला. (Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan)

 नुकत्याच पार पडलेल्या महाअंतिम सोहळ्यात सर्वांच्या लाडक्या सूरज चव्हाणने बाजी मारली आणि ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. शोचा होस्ट रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदाची घोषणा करत सूरज चव्हाणचे नाव जाहीर केलं आहे. सूरजला बिग बॉसच्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे. मात्र त्याच्या या विजयावर काही प्रेक्षक कलाकार मंडळी नाखुश असल्याचे पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या सूरजच्या प्रोमोखाली अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोखाली “सूरजने सहानूभुतीने हा शो जिंकला आहे. खरा विजेता तर अभिजीतच आहे”, “हे पर्व चांगले होते, स्पर्धकही चांगले होते. पण ‘बिग बॉस’ने घेतलेले निर्णय सर्वात वाईट होते, सूरज एक व्यक्ती म्हणून छान असला तरी घरात त्याहूनही चांगली पात्र माणसं होती जी प्रत्यक्षात खेळली होती” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसंच अभिनेत्री मिताली मयेकर व आरती सोलंकी यांनीदेखील सूरजच्या विजयावर उपहासात्मक पोस्ट शेअर केल्या आहेत. आरतीने पोस्ट शेअर करत “मी गरीब आहे” असं म्हटलं आहे तसंच “छपरीपणा सुरु करायला हवा” असं म्हटलं आहे. तसंच मितालीने ‘सहानुभूती शो आहे की रिअॅलिटी शो आहे’ अशी पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Aartii Sharu Solankii (@aartiisolankii)

या कमेंट्सबरोबरचं अनेकांनी निक्की, अंकिता, डीपी व अभिजीत यांच्या खेळाचेही कौतूक केलं आहे. दरम्यान, शोचा विजेता झाल्यानंतर सूरजने ““मी बोललो होतो ट्रॉफी मीच जिंकणार, माझी जिद्द होती आणि माझा विश्वास होता आणि टी ट्रॉफी मी जिंकली आहे. ॐ नम: शिवाय, आई मरी माता, हर हर महादेव, मला माहीत होतं अभिदादा माझ्याबरोबर शेवटपर्यंत असणार” या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.   

Tags: Abhijeet Sawant Bigg Boss Marathi Season 5 WinnerBigg Boss Marathi Season 5 Winner Suraj ChavanSuraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Bigg Boss Hindi 18 Grand Premiere Updates

Bigg Boss Hindi 18 Grand Premiere : तेजिंदर पाल सिंह बग्गा, श्रुतिका अर्जुन, नायरा बॅनर्जी व चुम दरंग यांची ‘बिग बॉस १८’च्या घरात धमकेदार एंट्री, काय होणार धमाल?  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.