शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi च्या ग्रँड फिनालेनंतर अभिजीतच्या वाढदिवसांचं जंगी सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “माझी ट्रॉफी…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 7, 2024 | 10:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Boss Marathi 5 grand finale Abhijeet Sawant celebrated his birthday with his family and friends.

Boss Marathi 5 चा ग्रँड फिनालेनंतर अभिजीतच्या वाढदिवसांचं जंगी सेलिब्रेशन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : 6 ऑक्टोबर रविवार ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा पार पडला आणि सूरज यंदाच्या पर्वाचा विजेता, तर अभिजीत सावंत उपविजेता ठरला आहे. ‘बिग बॉस मराठी ५’चा ग्रँड फिनाले झाल्यानंतर अभिजीत सावंतच्या घरी त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. याशिवाय, त्याच्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशनही पार पडलं आहे. अभिजीत सावंतचा आज म्हणजेच ७ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिजीतने कुटुंब आणि मित्रमंडळीबरोबर त्याचा वाढदिवस साजरा केला. (Boss Marathi 5 grand finale Abhijeet Sawant)

अभिजीतने कुटुंबाबरोबरच्या त्याच्या वाढदिवसाच्या जंगी सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे आणि या व्हिडीओद्वारे त्यांनी आपल्या चाहत्यांचे व शो पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत. या व्हिडीओमध्ये त्याने म्हटलंय की, “ज्यांनी ज्यांनी मला मतदान केलं, ज्यांनी ज्यांनी ‘बिग बॉस मराठी’ हा शो बघितला, त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. आज माझा वाढदिवस असून मी तो माझं कुटुंब आणि मित्रपरिवाराबरोबर साजरा करत आहे”.

View this post on Instagram

A post shared by Abhiijeet Saawant (@abhijeetsawant73)

त्याचबरोबर या व्हिडीओखाली त्याने असं म्हटलं आहे की, “मला वाढदिवसाच्या शुभेच्छा पण माझ्या बिग बॉस मराठी प्रवासाचा एक भाग असलेल्या प्रत्येकाचे कौतुक. माझी खरी ट्रॉफी म्हणजे तुमचे प्रेम आहे. तुमचे प्रेमाला प्रेरणा देतं आणि या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद”. अभिजीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याची पत्नी, मुली व त्याचे अनेक मित्रमंडळी पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओखाली अनेकांनी अभिजीतला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. तसंच आमच्यायातही तूच विजेता आहेस अशा अएक कमेंट्स ही या व्हिडीओखाली केल्या आहेत.

आणखी वाचा – “अतिशय प्रतिकूल परिस्थिती असूनही…”, सुप्रिया सूळेंसह इतर राजकीय मंडळींकडून सूरजची वाहवा, म्हणाले, “बारामतीचा रीलस्टार…”

“वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा विनर”, “दादा आमच्यासाठी तूच विनर आहे”, “जे होतं चांगल्यासाठी होतं, देव तुझं भलं करो”,”तू एक चांगला गायक असण्याबरोबरचं एक चांगला माणूस आहेस. लोकांनी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही तू त्यांचा निरादर केला नाही”, “तू खरा हिरो आहे”, “हार कर जितनेवाले को बाजीगर कहते हैं” या आणि अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी अभिजीतचे कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – “सहानूभूती जिंकली? गरीब म्हणून…”, सूरज चव्हाण विजेता झाल्यानंतर प्रेक्षकांसह कलाकारांची नाराजी, म्हणाले, “चुकीचा निर्णय…”

दरम्यान, अभिजीतच्या अनेक चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातीलही अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी ५’चा महाविजेता सूरज चव्हाण ठरला असून या शोच्या उपविजेतेपदाचा बहुमान गायक अभिजीत सावंतला मिळाला आहे. एकूण सहा स्पर्धकांपैकी टॉप २ मध्ये जाण्याची मजल  अभिजीत वक सूरज यांनी मारली. त्यामुळे शेवटच्या फेरीत अनेकजण अभिजीतच्या विजेते होण्याची वाट पाहत होते. मात्र अभिजीतची ही संधी थोडक्यात हुकली असं म्हणता येईल.

Tags: Abhijeet Sawant BirthdayBoss Marathi 5 grand finaleBoss Marathi 5 grand finale Abhijeet Sawant
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Winner

"टॉपची मालिका करुनही लीड रोल मिळत नाही आणि…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा सूरज चव्हाणला टोमणा, म्हणाला, "फक्त झापूक झुपूक बोलून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.