Bigg Boss Marathi 5 : 6 ऑक्टोबर रविवार ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा पार पडला आणि सूरज यंदाच्या पर्वाचा विजेता, तर अभिजीत सावंत उपविजेता ठरला आहे. ‘बिग बॉस मराठी ५’चा ग्रँड फिनाले झाल्यानंतर अभिजीत सावंतच्या घरी त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. याशिवाय, त्याच्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशनही पार पडलं आहे. अभिजीत सावंतचा आज म्हणजेच ७ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिजीतने कुटुंब आणि मित्रमंडळीबरोबर त्याचा वाढदिवस साजरा केला. (Boss Marathi 5 grand finale Abhijeet Sawant)
अभिजीतने कुटुंबाबरोबरच्या त्याच्या वाढदिवसाच्या जंगी सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे आणि या व्हिडीओद्वारे त्यांनी आपल्या चाहत्यांचे व शो पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत. या व्हिडीओमध्ये त्याने म्हटलंय की, “ज्यांनी ज्यांनी मला मतदान केलं, ज्यांनी ज्यांनी ‘बिग बॉस मराठी’ हा शो बघितला, त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. आज माझा वाढदिवस असून मी तो माझं कुटुंब आणि मित्रपरिवाराबरोबर साजरा करत आहे”.
त्याचबरोबर या व्हिडीओखाली त्याने असं म्हटलं आहे की, “मला वाढदिवसाच्या शुभेच्छा पण माझ्या बिग बॉस मराठी प्रवासाचा एक भाग असलेल्या प्रत्येकाचे कौतुक. माझी खरी ट्रॉफी म्हणजे तुमचे प्रेम आहे. तुमचे प्रेमाला प्रेरणा देतं आणि या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद”. अभिजीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याची पत्नी, मुली व त्याचे अनेक मित्रमंडळी पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओखाली अनेकांनी अभिजीतला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. तसंच आमच्यायातही तूच विजेता आहेस अशा अएक कमेंट्स ही या व्हिडीओखाली केल्या आहेत.
“वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा विनर”, “दादा आमच्यासाठी तूच विनर आहे”, “जे होतं चांगल्यासाठी होतं, देव तुझं भलं करो”,”तू एक चांगला गायक असण्याबरोबरचं एक चांगला माणूस आहेस. लोकांनी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही तू त्यांचा निरादर केला नाही”, “तू खरा हिरो आहे”, “हार कर जितनेवाले को बाजीगर कहते हैं” या आणि अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी अभिजीतचे कौतुक केलं आहे.
दरम्यान, अभिजीतच्या अनेक चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातीलही अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी ५’चा महाविजेता सूरज चव्हाण ठरला असून या शोच्या उपविजेतेपदाचा बहुमान गायक अभिजीत सावंतला मिळाला आहे. एकूण सहा स्पर्धकांपैकी टॉप २ मध्ये जाण्याची मजल अभिजीत वक सूरज यांनी मारली. त्यामुळे शेवटच्या फेरीत अनेकजण अभिजीतच्या विजेते होण्याची वाट पाहत होते. मात्र अभिजीतची ही संधी थोडक्यात हुकली असं म्हणता येईल.