बोनी कपूर यांच्या कुटुंबातील मंडळी बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. जान्हवी कपूर, खुशी कपूर, अर्जुन कपूर यांनी कलाक्षेत्रामध्ये आपली वाटचाल राकध्यूर यांनी कलाक्षेत्रामध्येसुरु ठेवली. मात्र अर्जुनची बहीण अंशुला कपूर सिनेविश्वापासून दूर राहिली. तरीही ती नेहमीच टॉक ऑफ द टाऊन ठरते. अंशुलाचे विविध फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तसेच अंशुला तिच्या वाढत्या वजनामुळे बऱ्याचदा चर्चेत असायची. आता वजन कमी करत तिने फिटनेसचं एक नवं उदाहरण सगळ्यांसमोर आणलं. आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अंशुलाने बॉयफ्रेंड रोहन ठक्करसह साखरपुडा केला आहे. (Anshula Kapoor Engagement)
अंशुलाने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे रोहनबरोबरचे काही फोटो शेअर केले. तसेच आयुष्यभरासाठी रोहनला हा बोलल्याचं तिने पोस्टद्वारे म्हटलं आहे. रोहनचं कौतुक करणारी तिने मोठी पोस्ट लिहिली. तसेच त्यांची सुंदर आणि छोटी लव्हस्टोरीही सांगितली. परदेशात अगदी सगळ्यांसमोर गुडघ्यावर बसून रोहनने अंशुलाला अंगठी घातली. दरम्यान यावेळी अंशुलाला काही करावं कळेना. ती आनंदाच्या भरात भारावून गेली होती. मनसोक्त हसत थरथरत असलेला हात अंशुलाने रोहनच्या हातात दिला.
गेल्या तीन वर्षांपासून अंशुला व रोहन एकमेकांना डेट करत आहेत. न्युयॉर्कमधील सेंट्रल पार्कमध्ये रोहनने अंशुलाला प्रपोज केलं होतं. भारतीय वेळेनुसार रात्री ठिक १.१५ मिनिटांनी त्याने प्रपोज केलं. अंशुलाने प्रपोजदरम्याने फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोघांचा अगदी साधा अंदाज दिसत आहे. अंशुलाने पांढऱ्या रंगाचा लाँग वनपिस परिधान केला आहे. तर रोहनने पँट, शर्ट घातलं आहे. विशेष म्हणजे अंशुला तिच्या नव्या आयुष्यात अगदी खुश असल्याचं फोटोंद्वारे स्पष्टपणे दिसून येत आहे.
अंशुलाच्या अंगठीची डिझाइन विशेष लक्षवेधी आहे. अंगठीला दोन हिरे आहेत. तिने अंगठीचा फोटोही शेअर केला आहे. साखरपुड्याबाबत सांगताच अंशुलावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच भाऊ अर्जुनही भावुक झाला आहे. अर्जुननेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बहिणीसाठी आनंद व्यक्त केला. त्याचबरोबरीने आईची आज खूप जास्त आठवण येत असल्याचंही त्याने म्हटलं आहे.





