रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला भंगारवाला, हिण दर्जेचा, अहंकारी म्हणालात तरीही…”, शरद उपाध्ये यांच्या आरोपांवर निलेश साबळेंचा संताप, म्हणाले, “बोलण्याआधी तपासा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 4, 2025 | 11:10 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
nilesh sabale clarification

"मला भंगारवाला, हिण दर्जेचा, अहंकारी म्हणालात तरीही…", शरद उपाध्ये यांच्या आरोपांवर निलेश साबळेंचा संताप, म्हणाले, "बोलण्याआधी तपासा…"

nilesh sabale clarification : राशिचक्रकार शरद उपाध्ये आणि डॉ. निलेश साबळे यांच्यातील वाद पेटून उठला. शरद यांनी निलेश यांना थेट टार्गेट करत त्यांच्याविरोधात पोस्ट शेअर केली. आणि निलेश यांनी काल शरद यांच्या या पोस्टला प्रत्युत्तर दिलं आहे. १० वर्षांपूवीचा उल्लेख करत त्यांनी निलेश यांना टोकलं. त्यामुळे निलेश यांनीही त्यांना त्यांच्याच भाषेत थेट उत्तर दिलं. सहा वर्षांपूर्वीही शरद उपाध्ये यांनी निलेश यांना थेट पोस्ट करत भंगारवाला असं म्हटलं. यावर निलेश यांनी वडीलधारी व्यक्ती म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं. याबाबत आता सहा वर्षांनी निलेश यांनी शरद यांना याबाबत व्हिडीओद्वारे विचारलं. सध्या त्यांचा हा वाद विशेष चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे.

निलेश यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “वडीलधाऱ्या अधिकाऱ्याने मी निलेश साबळेंना काही सांगायचा प्रयत्न केला असं तुम्ही म्हटलं, तर माझा आणि माझ्या वडिलांचा काही विसंवाद झाला तर ते थेट मला फोन करतात, ते मला खडसावतात, हे तुझं चुकलं आहे हे मला स्पष्ट करतात. त्यांनी अधिकाराच्या बातमीने मला खडसावले असते सोशल मीडियावर पोस्ट नसतं केलं. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. अजूनही मी तुमचं ऐकतो. तुमच्या कॅसेट मी अजूनही ऐकतो. तुम्ही असं कराल असं मला कधीही वाटलं नाही, हे एकदा झालं असतं तर मी सोडूनही दिलं असतं, पण ही एक नाही तिसरी वेळ आहे”.

आणखी वाचा – “असे हिरे भंगारवाल्याच्या…”, निलेश साबळेंवर टीका करणारी सहा वर्षांपूर्वीची शरद उपाध्येंची ‘ती’ पोस्ट चर्चेत?, म्हणालेले, “कचऱ्याच्या भावात…”

View this post on Instagram

A post shared by Nilesh Sabale (@dr.nilesh_sabale_official)

सहा वर्षांपूर्वीचा तो मुद्दा पुन्हा काढत निलेश म्हणाले, “सहा वर्षांपूर्वीही तुम्ही अशीच पोस्ट केली होती की, भंगारवाल्यांच्या हाती असे कलाकार लागले आणि हिऱ्यांचा चुकीचा वापर केला. मोठी व्यक्ती म्हणून मी दुर्लक्ष केलं.. हा अपमान त्या पोस्टमध्ये नाही, जर हे दहावर्षापूर्वी घडलं होतं. प्रत्येकाला आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे पण फक्त आधी थोडी माहिती आत्मसात करणे गरजेचं आहे, डच्चू दिलं, हाकलून लावलं, चॅनेलने बाहेर काढलं हे बोलण्याआधी तपासा, वा थेट मला विचारा”.

आणखी वाचा – “स्माईल दिली नाही?”, शरद उपाध्येंच ते वाक्य निलेश साबळेंनी खोडून काढलं अन्…; म्हणाले, “माझ्याकडे साक्षीदार…”

शेवटी निलेश संताप व्यक्त करत म्हणाले, “सर, मला तुमच्या पोस्टमध्ये तुम्ही भंगारवाला म्हणाला होता. भंगारवाला, अहंकारी, हीन दर्जाचा, सर्वनाश, अधःपतन, खालच्या दर्जाचा हे सगळं तुम्ही ६ वर्षांपूर्वीच्या पोस्टमध्ये लिहिलंय. तुम्ही इतकं सगळं बोलायचं आणि आम्ही फक्त ऐकून घ्यायचं. ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करतोय हे मला माहिती आहे. आमची खूप उत्तम मैत्री आहे, ती कायम राहील. अभिजीत माझ्याहीपेक्षा उत्तम सूत्रसंचालन करतो त्यामुळे त्याला आणि टीमला माझ्या मनापासून शुभेच्छा. हा कार्यक्रम माझ्या कायम हृदयात राहील”.

Tags: chala hawa yeu dyanilesh sabale clarificationnilesh sable controversy
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
shefali jariwala death

"तिला कधीच विसरु शकत नाही", शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या सहा दिवसांनी पतीची भावुक पोस्ट, म्हणाला, "प्रत्येकाची आई…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.