बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांनी गेली अनेक दशकं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षीदेखील ते चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारताना दिसतात. अमिताभ हे अनेकदा कुटुंबाबरोबरदेखील वेळ घालवताना दिसतात. त्यांची नात नव्या नवेली नंदा ही सध्या अधिक चर्चेत आली आहे. अनेक स्टारकीड मनोरंजन क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवताना दिसतात. मात्र नव्याने असे काही केले आहे ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच सर्वच स्तरातून तिचे कौतुकदेखील केले जात आहे. (Navya naveli nanda IIM)
अमिताभ व जया यांची नात नव्या भारतातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेत आहे. त्या ठिकाणी मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण करणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने याबद्दलची माहिती दिली आहे. तिने IIM प्रवेशपरीक्षा पास केली असून देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणार आहे. व्यावसायिका बनण्यासाठी तिचे हे पहिले पाऊल आहे. IIM परीक्षा पास झाल्यानंतर ती ‘इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ अहमदाबाद येथे प्रवेश मिळाला आहे. तिच्यासाठी हे सगळं स्वप्नवत असल्याचे देखील म्हंटले आहे.
नव्या ही इतर स्टारकीडप्रमाणे नसल्याने अनेक जण तिची वाहवा करत आहेत. परदेशात न जाता भारतात राहूनच ती शिक्षण घेणार असल्याचे तिचे कौतुक होत आहे. IIM अहमदाबाद ही देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थेपैकी एक आहे. त्यामुळे तिथे प्रवेश मिळाल्याने नव्या खूपच खुश आहे.
नव्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जे फोटो शेअर केले आहेत त्यामध्ये कॉलेज कॅम्पसच्या बाहेर पोज देताना दिसत आहे. याठिकाणी ती दोन वर्षांचा ‘ब्लेंडेड पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम’ करणार आहे. या आधी नव्याने परदेशात शिक्षण घेतले आहे. लंडन येथिण सेवनॉक्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि न्यूयॉर्क येथील फोर्डहम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतलं होता. या ठिकाणी तिने डिजिटल टेक्नॉलॉजी व यूएक्स डिझाईनमध्ये पदवी शिक्षण घेतले आहे.