Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वातील स्पर्धकांची अंतिम सोहळ्यात जाण्यासाठीची चढाओढ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, या घरात टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धक एकमेकांना मागे टाकून स्वत: पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि यासाठी ‘बिग बॉस’ स्पर्धकांमध्येच शर्यत लावतात. यासाठी ते दर आठवड्यात नॉमिनेशन टास्क आणतात. या नवीन टास्कमध्ये प्रत्येक स्पर्धाक त्याचं या घरात राहण्यासाठीचे महत्त्व सांगत इतर स्पर्धकांना नॉमिनेट करत असतो. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा एकदा निमिनेशन टास्क पार पडणार असून या नवीन टास्कमध्ये घरातील सर्व स्पर्धक त्यांचं या घरातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
नुकताच या नॉमिनेशन टास्कचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे आणि या नवीन टास्कमध्ये असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या स्पर्धकाला रद्दीत टाकून नॉमिनेट करायचे आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक स्पर्धक त्याचे घरातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी इतरांना नॉमिनेट करणार असल्याचे पाहायला अमिळत आहे. यावेळी धनंजय “तिला या खेळातली काय समजच नाहीये” असं म्हणत कुणाला तरी नॉमिनेट करत आहे. तर जान्हवी “तो दुसऱ्यांच्या डोक्याने चालतो” असं म्हणत एकाला नॉमिनेट करणार आहे. तसंच अभिजीतही कुणाला तरी “स्वत:चे मत आहे का तुला?” असं म्हणत आहे. त्याचबरोबर अरबाज “समोरून गेम खेळत नाही” असं म्हणत एकला नॉमिनेट करत आहे.
आणखी वाचा – वैभव मांगलेंच्या लेकीने पहिल्यांदाचं बनवला संपूर्ण स्वयंपाक, अभिमानाने म्हणाले, “लवकरच माझा मुलगाही…”
पुढे निक्की कुणाला तरी “तुझ्यापेक्षा गद्दार या घरात कुणी नाही” असं म्हणत आहे. तर रद्दीचा कागद फाडताना घन:श्यामचा हात थरथरत असल्याबद्दल धनंजय त्याला टोमणा मारतो. यावर घन:श्याम त्याला तुम्ही कोण आहात थरथरायला” असं म्हणत शड्डू ठोकतानाचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या नॉमिनेशन टास्कमध्ये आता कोण कुणावर वरचढ ठरणार? हे येत्या आठडव्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात अभिजीत, निक्की, अंकिता व वर्षा उसगांवकर या नॉमिनेशनमध्ये होत्या.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सूरज-जान्हवीने केली निक्की-अरबाजची नक्कल, डीपीनेही दिली साथ, इतर स्पर्धकांना हसू अनावर
‘बिग बॉस मराठी’च्या गेल्या आठडव्यात वोटिंग लाईन्स बंद असल्यामुळे कुणीच स्पर्धक घराबाहेर गेला नाही. रितेशने अंकिताबरोबर एलिमिनेशनची मस्करी केली. मात्र सर्वांना एलिमिनेशनचे महत्त्व कळावे यासाठी ही मस्करी होती असं रितेश सांगतो. अंकिताचं एव्हिक्शन सर्वांसाठी धक्कादायक असतं. ती घरातून पाटी घेऊन निघते, मुख्यद्वारही उघडलं जातं. डीपी, सूरज अक्षरश: ढसाढसा रडतात. जेव्हा दार उघडतं तेव्हा असे लिहिलेले असते की, ‘इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा स्वत: चांगलं खेळा, अपेक्षा आहेत. या आठवड्यात तुम्ही सेफ आहात’.