अभिनेते वैभव मांगले हे मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार म्हणून ओळखले जातात. मालिका, नाटक, चित्रपट या सगळ्या माध्यमांमध्ये वैभव मांगले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. उत्तम अभिनयाबरोबर वैभव मांगले त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. वैभव मांगले सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते विविध पोस्ट शेअर करत त्यांची मतं व्यक्त करत असतात. अशातच त्यांनी नुकतीच त्यांच्या मुलीबद्दलची एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. मुलीचं कौतुक करणारी ही पोस्ट असून यामध्ये त्यांनी मुलीबद्दल अभिमान असल्याचंदेखील म्हटलं आहे. (Vaibhav Mangle Daughter Cooking)
कोणत्याही बापासाठी त्यांच्या मुलांनी आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी नवीन साध्य केल्याबद्दल आनंद व अनिमान असतो. मग ती शैक्षणिक प्रगती असो, एखाद्या खेळात बक्षीस जिंकणं असो किंवा पहिल्यांदा साग्रसंगीत जेवण बनवणं असो. प्रत्येक बापाला मुलाने साध्य केलेल्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान असतो. असाच अभिमान अभिनेते वैभव मांगले यांनी आपल्या लेकीबद्दल व्यक्त केला आहे. वैभव यांच्या मुलीने पहिल्यांदा जेवण केलं असून याबद्दल त्यांनी खास अभिमानास्पद पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सूरज-जान्हवीने केली निक्की-अरबाजची नक्कल, डीपीनेही दिली साथ, इतर स्पर्धकांना हसू अनावर
या पोस्टमध्ये वैभव यांनी असं म्हटलं आहे की, “आज पहिल्यांदा माझ्या मुलीने पौलोमीने सगळा स्वयंपाक तयार केला. कोबी फ्लॉवर बटर मसाला, चपाती, भाकरी, भात आणि वरण. खूप अभिमान वाटला. लवकरच माझा मुलगा ही स्वयंपाक करायला लागेल”. या पोस्टसह त्यांनी लेकीचा फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये टेबलवर सर्व जेवण ठेवलं असल्याचं पाहायला मिळत आहे. वैभव यांनी शेअर केलेल्या या पोस्टला त्यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेक नेटकऱ्यांसह अनेक कलाकारांचाही समावेश आहे.
वैभव मांगले हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय राहतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांसह विविध फोटो व व्हिडीओ शेअर करतात. दरम्यान, वैभव यांची ‘वाडा चिरेबंदी’, ‘करून गेलो गाव’, ‘अलबत्या गलबत्या’ यांसारखी अनेक नाटकं गाजली आहेत. शिवाय, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘माझे पती सौभाग्यपती’ ही मालिका व ‘टाईमपास’सारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत