बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकरल्या आहेत. मात्र सध्या अभिनय सोडून तिने राजकारणात प्रवेश केला आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी या विभागातून ती निवडून आली आहे. त्यानंतरदेखील ती मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिली आहे. सध्या ती आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’मुळे चर्चेत आली आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. (kangana ranaut on jaya bachchan)
देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका या चित्रपटात कंगनाने साकारली आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दृश्य या चित्रपटात दाखवू नयेत अशी मागणीदेखील केली जात आहे. याबाबतचा तिचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशातच पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. कंगनाने आता जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.
काही दिवसांपूर्वी जया या संसदेमध्ये केलेल्या एका व्यक्तव्यामुळे चर्चेत आल्या होत्या. पती अमिताभ बच्चन यांचे नाव त्यांच्या नावाबरोबर जोडले गेले होते. त्यांचे नाव जया अमिताभ बच्चन असे घेतल्याने खूप निराश झाल्या आणि रागामध्ये खूप काही बोलून गेल्या. मात्र त्यानंतर अमिताभ यांचे नाव घेऊन त्यांच्यावर गर्व असल्याचेदेखील सांगितले. त्यावर आता कंगना भाष्य करताना दिसली आहे.
कंगनाने ‘फिव्हर FM’ला मुलाखत दिली. यामध्ये तिने जया यांच्याबद्दल बोलताना म्हणाली की, “ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. निसर्गाने पुरुष व महिलांना वेगवेगळे बनवलं आहे. पण आजकाल स्त्रीवादाच्याच्या नावावर महिला काहीही बोलतात. आपला समाज घमंडी होत चालला आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. लोकांना वाटत की आपली ओळख हरवली आहे. जया यांना मध्येच पॅनिक अटॅक येतो. लोक खूप घाबरले आहेत आणि हे खूप चुकीचे आहे”.
दरम्यान कंगनाने जया यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत. मात्र जया यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.