बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाची सगळीकडे मोठी क्रेझ आहे. अवघ्या काही दिवसांतच हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, आपल्या चित्रपटाला यश मिळावं, यासाठी शाहरुख कोणतीही कसर सोडत नसून चित्रपटाचे प्रमोशन करण्याबरोबर तो विविध ठिकाणच्या मंदिरांना भेट देत आहे. (Shah Rukh Khan in Tirupati)
काही दिवसांपूर्वी जम्मू येथील वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर शाहरुखने नुकतंच आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आहे. यावेळी त्याच्यासह त्याची लेक सुहाना व अभिनेत्री नयनतारासुद्धा होती. शाहरुखच्या तिरुपती दर्शनाचा हा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. ज्यात शाहरुख व त्याची लेक स्थानिक पेहरावात दिसत आहे. दर्शन घेतल्यानंतर शाहरुखने मंदिरातून बाहेर पडत हात जोडून चाहत्यांना अभिवादन केलं. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे.
हे देखील वाचा – अमीषा पटेलसाठी गेल्या २० वर्षांपासून नवरा शोधतोय संजय दत्त, अभिनेत्री म्हणते, “माझं लग्न करण्यासाठी तो…”
#WATCH | Andhra Pradesh: Actor Shah Rukh Khan, his daughter Suhana Khan and actress Nayanthara offered prayers at Sri Venkateshwara Swamy in Tirupati pic.twitter.com/KuN34HPfiv
— ANI (@ANI) September 5, 2023
शाहरुखच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक ऍटली दिग्दर्शित ‘जवान’ एक अॅक्शनपॅक चित्रपट आहे. विशेष म्हणजे, ऍटली यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून शाहरुखचं होम प्रॉडक्शन रेड चिलीज एंटरटेनमेंटने याची निर्मिती केली आहे. (Jawan Movie)
हे देखील वाचा – खून, वाद-विवाद, गुन्हेगारी अन्…; ६०च्या दशकातील गँगस्टर दुनिया, ‘बम्बई मेरी जान’चा ट्रेलर पाहिलात का?
काही दिवसांपूर्वी ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्यात शाहरुखचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या चित्रपटात शाहरुखसह अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोवर व मराठमोळी गिरीजा ओक मुख्य भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.