बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा सुरु आहे ती ‘गदर २’ या चित्रपटाची. ‘गदर’ चित्रपटाच्या सिक्वेलची जेव्हापासून घोषणा झाली तेव्हापासून सगळेचजण चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते. ‘गदर २’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दर्शविला. य चित्रपटामुळे चित्रपटातील मुख्य नायिका अभिनेत्री अमीषा पटेल विशेष चर्चेत आली. आजवर अमीषा पटेल हिने तिच्या कारकिर्दीत बॉलिवूडमधील सगळ्या बड्या कलाकारांसह काम केलं आहे. आमिर खान, सलमान खान, संजय दत्त, सनी देओल यांसारख्या बड्या कलाकारांसोबत अमीषाने स्क्रीन शेअर केली आहे. (Ameesha Patel On Sanjay Dutt)
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अमीषाने या बड्या स्टारकास्टसह काम करण्याबद्दल भाष्य केलं. अमीषा या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव शेअर करत म्हणाली, “आमिर अत्यंत प्रोफेशनल, वक्तशीर व भूमिकेचा सखोल अभ्यास करून काम करणारा अभिनेता आहे. तर सलमान खान अतिशय खोडकर आणि माझा खूप चांगला मित्र आहे. सलमानबरोबरच्या मैत्रीला अमिषाने ‘नॉटी बॉय बेस्ट फ्रेंड’ असं नाव दिलं आहे.
संजय दत्त यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर करत अमीषा म्हणाली, “गेल्या २० वर्षांपासून संजय दत्त माझं लग्न जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. तो नेहमी मला म्हणतो, अमिषा तू या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी खूप भोळी आहेस. चल, तुझं मी लग्न लावून देतो. गेल्या २० वर्षांपासून तो माझ्यासाठी जोडीदार (परफेक्ट मॅच) शोधत आहे. तुझ्या लग्नात कन्यादान मी करणार, असं संजूने मला सांगून ठेवलं आहे. माझं लग्न झाल्यावर त्याला खूप आनंद होईल.”
आजवर अमीषाने तिच्या अभिनयकौशल्याने साऱ्यांच्या मनावर राज्य केलं आहे. बड्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभवही तिने तिच्या अभिनय कौशल्यामुळेच घेतला. आमिरसह ती ‘मंगल पांडे: द रायझिंग’ (२००५) या चित्रपटात, संजय दत्तच्या ‘तथास्तु’ आणि ‘चतुर सिंग टू स्टार’ या चित्रपटात तर सलमानसह ती ‘ये है जलवा’ चित्रपटात झळकली. आता काही दिवसांपूर्वीच तिने सनी देओलबरोबर ‘गदर २’ या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली.