Mukta Barve Entry : ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर एकापेक्षा एक आणि उत्तम कथानक असलेल्या मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. या मालिकांमधील कलाकार त्यांच्या उत्तम अभिनयाने मालिकांची उंची वाढवतात. या वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ ही मालिका प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन करताना दिसतेय. मालिकेतील चिमुकल्या इंदूचे पात्र विशेष लक्षवेधी ठरतंय. अशातच ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर असताना आता या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार असल्याचे समोर आले आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये हे नवं पात्र पाहायला मिळतंय. मालिकेत एंट्री घेतलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मुक्ता बर्वे आहे.
मुक्ता बर्वेने आजवर मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘अग्निहोत्र’, ‘अजूनही बरसात आहे’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रुद्रम’ या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र, मध्यंतरीचा काही काळ अभिनेत्री छोट्या पडद्यापासून दूर राहिलेली दिसली. यादरम्यान ती चित्रपट व नाटकांकडे वाळलेली दिसली. आता ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री ‘कलर्स मराठी’च्या ‘इंद्रायणी’ मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारूमुळे किर्लोस्कर कुटुंबावरील संकट टळलं, आदित्यने माफी मागत काळजीही केली व्यक्त
‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. कपाळावर मोठी टिकली, गळ्यात माळा, साडी, डोळ्याला गॉगल लावून हटके लूकमध्ये मुक्ताची मालिकेत एन्ट्री होणार आहे. “आनंदीबाईंच्या वर्चस्वाला आव्हान द्यायला विठुच्या वाडीत आली एक नवी पाहुणी!” असं कॅप्शन देत ‘कलर्स मराठी’ वाहिनीने हा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टद्वारे मालिकेत मुक्ता झळकणार असल्याची आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिली आहे.
इंद्रायणी’ मालिकेत मुक्ताने एन्ट्री घेतल्याचा खास सीन प्रेक्षकांना शनिवारी १६ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. आता आनंदीची जिरवून लहानग्या इंदूची मदत मुक्ता कशी करणार हे मालिकेत पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. अभिनेत्रीच्या एन्ट्रीचा प्रोमो सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह कलाकार मंडळींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.