शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दीड तासाच्या डॉक्युमेंट्रीमध्ये हनी सिंहने प्रेक्षकांना काढलं वेड्यात, शाहरुख खानच्याच नावावर सगळा गेम अन्…

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 21, 2024 | 4:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood singer Honey Singh commented on life, his controversy with Shahrukh Khan, illness and conflict in the Netflix Famous documentary

यो यो हनी सिंह नेटफ्लिक्स फेमस डॉक्युमेंट्री

‘ब्रॉउन रंग’, ‘देसी कलाकार’, ‘सनी सनी’, ‘ब्ल्यू आईज्’, ‘मनाली ट्रान्स’ अशा अनेक लोकप्रिय गाण्यांवर तरुणाईला थीरकायला भाग पाडणारा  गायक, संगीतकार व रॅपर म्हणजे ‘यो यो हनी सिंह. आजवर त्याने अनेक लोकप्रिय व प्रसिद्ध गाणी देत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे आणि रसिक श्रोत्यांवरील या गाण्यांची मोहिनी कायम आहे. एकेकाळी यश, प्रसिद्धी व लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या हनी सिंहचे आयुष्य व्यसनाने उद्ध्वस्त केले. तो व्यसनांच्या इतका आहारी गेला होता की, यामुळे त्याला अनेक मानसिक व शारीरिक आजारांचाही सामना करावा लागला होता. अशातच आता त्याच्या आयुष्यावर आधारित एक सीरिज आली आहे. (Honey Singh Netflix Famous documentary)

यो यो हनी सिंहची ‘फेमस’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून यात त्याच्या आयुष्यावर आधारित काही घटनांवर भाष्य करण्यात आलं आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित झाली असून १ तास २० मिनिटांच्या या माहितीपटात हनी सिंगने काहीही नवीन सांगितलेले नाही. या सीरिजमधील काही गोष्टी गोष्टी वगळता जनतेला मूर्ख बनवले गेल्याचे म्हटलं जात आहे. हनी सिंहच्या या डॉक्युमेंटरीमध्ये त्याच्या करमपुरा घरापासून ते त्याच्या टूर, मैफिली आणि मित्र आणि कुटुंब या सर्व गोष्टींबद्दल सांगितले. त्याचबरोबर हनी सिंहच्या बहिणीने त्याच्या गंभीर आजाराबद्दल आणि गायकाच्या खडतर प्रवासाबद्दल सविस्तर सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

आणखी वाचा – लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच प्रथमेश लघाटेने शेअर केले लग्नाचे Unseen Photo, म्हणाला, “आमच्या श्री. व सौ.च्या प्रवासाला…”

मात्र, हा माहितीपट पाहिल्यानंतर अनेकांना याट काही नवीन वाटलं नाही. शाहरुख खानबरोबरचा प्रसंग वगळता या सीरिजमध्ये तसं फार काही खास नसल्याचे मत आता व्यक्त केलं जात आहे. हनी सिंहने शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ मध्ये ‘लुंगी डान्स’ हे गाणं गायलं होतं जे प्रचंड गाजलं. तेव्हा हनी सिंह आणि शाहरुख खान यांनी एकत्र टूर केली होती. याच टूर दरम्यान शाहरुखने हनी सिंहला कानाखाली मारल्याची बातमी पसरली. यावर हनी सिंह या डॉक्युमेंटरीमधून भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – अक्षया देवधर पुन्हा मालिकेत काम करणार कळताच सासूबाई एकदम खूश, प्रोमो पाहून भारावल्या, म्हणाली, “टीव्हीवर दिसणार म्हणून…”

याशिवाय या सीरिजमध्ये अशी एकही गोष्ट नाही जी जनतेला माहीत नाही. त्याचे आजारपण, त्याची गाणी, त्याचे वाद, त्याची बायको आणि घटस्फोट, सगळं काही प्रेक्षकांना माहीत आहे. या डॉक्युमेंट्रीपूर्वी त्यांनी अनेक मुलाखती दिल्या होत्या. ज्यात त्याने याबद्दल सर्व काही सांगितले होते. आणि या डॉक्युमेंट्रीमध्येही तेच आहे. त्यामुळे हनी सिंहच्या या डॉक्युमेंट्रीने त्याच्या चाहत्यांची आणि प्रेक्षकांची काही प्रमाणात निराशा केली आहे

Tags: Honey SinghHoney Singh Netflix Famous documentaryyo yo honey singh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Ghoroghari Matichya Chuli fame Actress Reshma Shinde shared a special video of her Haldi ceremony.

महाराष्ट्रीयन पद्धतीला साऊथ इंडियन टच, शाही थाटात झाली रेश्मा शिंदेची हळद, Unseen Video समोर  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.