शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

यो यो हनी सिंहचा दिलजीत दोसांझला पाठिंबा, कॉन्सर्टवरील अटी-नियमांवरुन म्हणाला, “आता आम्ही लस्सी, ताक, जलजीरावर गाणी…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 27, 2024 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
yo yo honey singh on diljit dosanjh

गाण्यामध्ये लस्सी, ताक शब्द वापरणार हनी सिंह

पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांझसाठी २०२४ हे वर्ष खूप महत्त्वपूर्ण ठरलं आहे. या वर्षी त्याने संपूर्ण भारतभरात अनेक कॉन्सर्ट केले होते. त्याच्या सगळ्याच कॉन्सर्टसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेलीदेखील बघायला मिळाली. मात्र काही राज्यांमध्ये त्याच्या कॉन्सर्टवर बंदी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान देशातील काही राज्यांमध्ये त्याच्या दारु व ड्रग्स असे शब्द असलेल्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली. अनेक कलाकारांनी हे चुकीचं असल्याचा दावादेखील केला. नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौतनेदेखील दिलजीतला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर आता यामध्ये एक नवीन कलाकार दिलजीतला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावला आहे. (yo yo honey singh on diljit dosanjh)

सध्या बॉलिवूड व पंजाबी गायक, रॅपर हनी सिंह त्याच्या डॉक्युमेंट्रीमुळे खूप चर्चेत असलेला बघायला मिळत आहे. त्याने आता दिलजीतला पाठिंबा देत एक वक्तव्य केले आहे. हनी म्हणाला की, “ते दारुची दुकानं बंद नाही करत आहेत. ते राज्यांना दारुमुक्त करत आहेत आणि नंतर भारताला दारुमुक्त करतील. त्यानंतर आपण या विषयावर बोलू शकतो”. नंतर तो म्हणाला की, “आम्ही नक्कीच या अभियानामध्ये सहभागी होऊ. आम्ही लस्सी, ताक व जलजिरा याबद्दल गाणी लिहू”.

आणखी वाचा – २०२४मध्ये छोट्या पडद्यावरील बहुचर्चित मालिकांनी घेतला प्रेक्षकांचा निरोप, कोणी सेटवरच रडलं तर काही एकमेकांपासून दुरावल्याने भावुक

View this post on Instagram

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

तसेच यानंतर हनीला विचारले गेले की, त्याच्या ‘चार बोटल वोडका’ हे गाणं बदलायला सांगितलं तर काय करणार? त्यावर हनीने उत्तर दिले की, “मग गाणं फक्त एका ट्यूनवरच चालेल. आजकाल दारु हा शब्द ओघा ओघात रोज वापरला जातो. सगळ्या पार्टीमध्ये दारुचा समावेश असतो. दारुची संस्कृती फक्त पंजाबमध्ये नाही. आपण लग्नात जातो, कार्यक्रमांना जातो तेव्हा दारु प्यायली जाते. त्यामुळे ही पंजाबी संस्कृती असल्याचे बोलू नये”, असंही तो म्हणाला.

आणखी वाचा – Video : “लग्न झालंय मस्त आता…’, ‘शिवा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचा थाटामाटात गृहप्रवेश, असं आहे घर, बायकोचीही धमाल

दरम्यान काही दिवसांपूर्वी कॉन्सर्टमधील अटी व नियमांवरुन केलेल्या भाष्यामुळे दिलजीत चर्चेत आला होता. तो म्हणाला की, “जर सगळ्या राज्यांनी दारुच्या विक्रीवर बंदी घातली तर मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही दारुचा उल्लेख असलेली गाणी गाणार नाही”. दिलजीतचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले होते.

Tags: diljit singhsupportyo yo honey singh
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
sunita ahuja on govinda

गोविंदा पत्नीला करतात शिवीगाळ, सुनीता यांनी स्वतः सांगितलं सत्य, म्हणाल्या, “विश्वास नाही होत की…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.