अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव जड्ढा यांची सध्या राजकारण व मनोरंजन क्षेत्रात बरीच चर्चा सुरु आहे. निमित्त आहे ते म्हणजे त्यांच्या लग्नाचं. लवकरच हे दोघं विवाहबंधानात अडकणार आहेत. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं आणि त्यानंतर त्यांनी मे महिन्याच्या १३ तारीखला साखरपुडा उरकून घेतला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून होती. आता सप्टेंबरच्या २४ तारखेला ते दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकतीच त्यांच्या लग्नापुर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. (Parineeti- raghav marriage ardas ceremony)
लग्नानिमित्त दोघांच्याही घरात लगबग सुरु आहे. परिणीतीच्या मुंबईतील घराची सजावट करण्यात आली आहे. तर राघव चड्ढा यांच्या दिल्लीतील घरही सजलं आहे. नुकत्याच परिणीती लग्नापूर्वीच्या विधींसाठी दिल्लीत पोहोचली. तिथे अरदास ही लग्नापूर्वीची विधी संपन्न झाली. त्याचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे. या सोहळ्यात परिणीतीने ब्लूश पिंक सूटमध्ये दिसली. हातावरची घातलेल्या मेहंदीचा रंग खूप खुलून दिसत होता. या कार्यक्रमावेळी तिने डोक्यावर स्कार्फ बांधला होता. तर राघवनेदेखील तिच्या सूटच्याच रंगाला शोभेल असा गुलाबी रंगाचा पोशाख केला होता. दोघांच जोडं खूप शोभून दिसत होतं. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे.
यापूर्वी नुकतीच राघव व परिणीती यांची सूफी नाईटचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम दिल्लीत राघव चड्ढाच्या घरी आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा तसेच क्रिकेटर हरभजन सिंगही उपस्थित होता. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीदेखील या कार्यक्रमाला हजेरी लावली.आता लग्नापूर्वीच्या पारंपारिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे ज्यात टप्प्याटप्पाने मेहंदी, संगीत, हळदी अशा कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. हे सर्व कार्यक्रम उदयपूरमध्ये होणार आहेत. विशेष म्हणजे या विवाहसोहळ्यात फक्त जवळचे मित्र व कुटुंबियांना निमंत्रित केलं आहे
सूत्रांच्या माहितीनूसार, परिणीती व राघव यांचं लग्न उदयूपरच्या ५ स्टार हॉटेल द ओबेरॉय उदयविलास या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमांची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे आता परिणीतीचा विवाह सोहळा किती ग्रॅन्ड असणार आहे, याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे.