नाटक, चित्रपट व छोटा पडदा अशा सर्वच माध्यमांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवणारा मराठमोळा अभिनेता अमेय वाघ आता वेबसीरिजमुळे चर्चेत आलेला आहे. त्याची असुर ही वेबसीरिज प्रचंड गाजली आहे. काही दिवसांपूर्वी याचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, त्यालादेखील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता अमेय वाघ असुरनंतर आणखी एका हिंदी वेबसीरिजमध्ये दिसणार असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. (Amey Wagh new Webseries)
अभिनेता अमेय वाघ लवकरच ‘काला पानी’ या वेबसीरिजमध्ये झळकणार असून ज्यात तो पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, या वेबसीरिजमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. त्याचबरोबर अभिनेता चिन्मय मांडलेकर, मोना सिंग व अन्य कलाकार यामध्ये दिसणार आहे.
हे देखील वाचा – राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन, फोटो पोस्ट करत दिली आनंदाची बातमी
या सस्पेंस थ्रिलर वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळणार, हे अद्याप कळलेलं नसलं. तरी एकूणच अंदमानच्या काळ्या पाणीवर आधारित ही वेबसीरिज असल्याचे टीझरवरून समोर येत आहे. या वेब्सिरीजचे लेखन बिस्वपती सरकार यांनी केलं असून समीर सक्सेना आणि अमित गोलानी यांनी याचे दिग्दर्शन केलं आहे. ही वेबसीरिज १८ ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा – ‘पायलटची खुर्ची, माॅनिटर, टेक ऑफ लॅंडिंगची दांडी….’, एका स्माईलने संकर्षणने घेतला कधीही न घेतलेला अनुभव, म्हणाला, “विमानाच्या केबिनमध्ये…”
दरम्यान, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण करणाऱ्या अमेय वाघने आजवर अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण, त्याच्या असुर वेबसीरिजमुळे लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. एकूणच असूर वेबसीरिज गाजवल्यानंतर अमेयच्या या नव्या वेबसिरीजची सर्वांना उत्सुकता आहे.