Akshay Kelkar Home Tour : स्वतःच, हक्काचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते अगदी कलाकारांपर्यंत प्रत्येकजण स्वतःच घर घेण्यासाठी झगडत असतो. बरीच अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांचं स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. यांत एका मराठमोळ्या अभिनेत्याचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेता अक्षय केळकर. बरीच वर्ष भाड्याच्या घरात राहिल्यानंतर या अभिनेत्याने अखेर मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं. सिनेसृष्टीत कुणीही वारसा नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर अक्षयने स्वतःच स्थान निर्माण केलं. सिनेसृष्टीत पाय घट्ट रोवून उभ्या असणाऱ्या या जिद्दी कलाकाराचं अखेर एक स्वप्न पूर्ण झालं. अक्षयने त्याच्या या नव्या घराची संपूर्ण झलक दाखवली आहे.
अक्षयने त्याच्या युट्युब चॅनेलवर त्याच्या नव्या घराची झलक शेअर केली आहे. यामध्ये त्याने डिझाईन केलेलं संपूर्ण घर पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये घराचा दरवाजा हा लाकडी असून त्याबाजूला लाकडी पिलर बसवण्यात आला आहे. ज्याने या घराच्या एंट्रीची शोभा वाढविली आहे. याशिवाय दरवाज्याच्या बाहेर अक्षय केळकरच्या ‘बिग बॉस’च्या घरातील नेमप्लेट त्याने लावली आहे. त्यानंतर घरात शिरताच सुंदर अशी पांडुरंगाची मूर्ती आहे. याचे दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटते. अक्षयही घरात येता जाता पांडुरंगा चरणी नतमस्तक होतो. या मूर्तीच्या पाठी अक्षयने स्वतः असं काढलेला सुंदर चित्र पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – मायरा वायकुळच्या भावाला एक महिना पूर्ण, दाखवली बाळाची पहिली झलक, फोटो पाहून कौतुकाचा वर्षाव
पांडुरंगाच्या कपाळी असलेला नाम या चित्रात त्याने उत्तम रेखाटला आहे. घरात रोमन अंक असलेलं सुंदर असं घड्याळ पाहायला मिळत आहे. शिवाय घरात सुंदर अशी छत्रपती महाराजांची मूर्ती आहे. तसेच बरेचसे पेंटिंगही पाहायला मिळत आहेत. तसेच घरात इंडोर प्लांटही पाहायला मिळत आहेत. तसेच अक्षयने पैसे साठवून कॉलेजला असताना घेतलेला पहिला कॅमेराही गेली १२ वर्षे त्याने जपून ठेवला आहे. स्वामींचं छान असं पेंटिंगही त्याने लावलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील अक्षयचे अनेक फोटो असलेलं कोलाजही त्याने ठेवलं आहे.
तसेच ‘बिग बॉस मराठी’च्या विजेतेपदाची ट्रॉफी त्याने शोकेसवर ठेवलेली पाहायला मिळतेय. घरात झोपाळा असावा असं प्रत्येकाला वाटतं त्याप्रमाणे अक्षयच्या घरातही झोपाळा आहे. तसेच त्याच सुंदर असं इंटेरिअर असलेलं मॉड्युलर किचन लक्ष वेधून घेत आहे. अक्षयच हे सुंदर घर पाहून अनेकांनी त्याच कौतुक केलं आहे.