सध्या ‘बिग बॉस १८’ कार्यक्रम खूप चर्चेत आहे. लवकरच या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. नुकतीच यामध्ये अभिनेत्री काम्या पंजाबीणए उपस्थिती दर्शवली होती. यावेळी तिने विवियन डिसेनाच्या खेळाबद्दल खूप चर्चा केली. अभिनेत्रीने त्याच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच तो आता पहिल्यासारखा राहिला नसून बदलला असल्याचेही सांगितले. काम्याचं हे बोलणं विवियनला आवडलं नाही. त्याने अविनाश व ईशाबरोबर याबद्दल चर्चादेखील केली. काम्या खूप आधी त्याला ओळखायची आता तो बदलला असून फक्त सेटवरच दोघांची गाठभेट होते. काम्या विवियनबद्दल काय म्हणाली? ते आपण आता जाणून घेऊया. (kamya punjabi on vivian dsena)
काम्याने नुकतीच ‘टेलि मसाला’ला मुलाखत दिली. यामध्ये अभिनेत्रीने यावर दिलखुलासपणे भाष्य केले. यावेळी काम्याला विवियनच्या धर्मांतराबद्दल विचारण्यात आले. तिला विचारले की, “तो जितका आज आध्यात्मिक आहे तितकाच तो आधी होता का?”. त्यावर काम्याने उत्तर दिले की, “तो नेहमीच खूप पूजाअर्चा करायचा. पंडित वैगरे या सगळ्यावरच त्याची खूप श्रद्धा होती. तो शिवशंकराला खूप मानायचा. माणूस बदलतो. काही हरकत नाही. मीदेखील प्रत्येक धर्माला मानते. मी स्वतः एक-दोन रोजे ठेवले आहेत. पण विवियन भगवान शंकराला खूप मानत होता”.
दरम्यान ‘बिग बॉस’ची स्पर्धक सारा आरफीन खानने बाहेर आल्यानंतर सांगितले होते की, “विवियन घरी पाच वेळा नमाज करतो. तसेच “पत्नी नुरानमुळे अभिनेत्याने मुस्लिम धर्म स्वीकारला का?”, असेही काम्याला विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, “प्रत्येकाची वयक्तिक आवड आणि निवड असते. ते त्यांचे नातं आहे. याबद्दल मला काहीही बोलायचं नाही”.
दरम्यान आता लवकरच महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. यामध्ये विजेता कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ओरमॅक्स मीडियाच्या रेटिंगनुसार रजत दलाल पहिल्या क्रमांकावर असल्याचं समोर आलं आहे. हे रेटिंग २८ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ पर्यंत आहेत. रजत दलाल टॉप १० च्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर विवियन डिसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. करवनीर मेहरा तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिल्पा शिरोडकर चौथ्या क्रमांकावर तर चाहत पांडे पाचव्या क्रमांकावर आहे.