Raj Kundra Statement : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली असल्याचं समोर आलं. राज कुंद्रा यांच्या घरावर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर ईडीने छापे टाकले आहेत. या कृती पोर्नोग्राफी प्रकरणात आहेत. ज्यामध्ये त्याच्या घर, कार्यालय आणि इतर अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. काही तासांच्या छाप्यानंतर राज कुंद्रा यांनी एक वक्तव्य शेअर केले आहे. ज्यामध्ये त्यांनी पत्नी शिल्पा शेट्टीला या प्रकरणात ओढण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. राजने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर करत शिल्पा शेट्टीचे नाव न घेण्याची विनंती केली आहे.
मुंबई पोलिसांच्या २०२१ च्या प्रकरणावर ही कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई मोबाइल ॲपद्वारे अश्लील सामग्री तयार करणे आणि प्रसारित करण्याशी संबंधित आहे. यापूर्वीही या प्रकरणात शिल्पाचे नाव समोर आले होते. आता ते पुन्हा आणले जात असताना, राज यांनी पोस्ट शेअर केली आहे. राज कुंद्राने हा किस्सा त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत राजने आपले मतं मांडत बाजू सांभाळली आहे.
पोस्ट शेअर करत तो म्हणाला की, “ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे, माध्यमांकडे नाटक तयार करण्याचे कौशल्य आहे, सत्य काय आहे ते स्पष्ट करुया. गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेल्या तपासाचे मी पूर्ण पालन करत आहे. ‘सहयोग’, ‘अश्लील’ आणि ‘मनी लाँड्रिंग’च्या दाव्यांचा संबंध आहे, आम्हाला एवढेच म्हणायचे आहे की सनसनाटी सत्याची छाया पडणार नाही, शेवटी न्यायाचा विजय होईल”. राज यांनी शेवटी लिहिले, “माझ्या पत्नीचे नाव पुन्हा पुन्हा ओढण्याची गरज नाही. कृपया सीमांचा आदर करा”.
शुक्रवारी दुपारी शिल्पा शेट्टीच्या वकिलाने एक विधान शेअर केले होते की, त्यांच्या क्लायंटचा या तपासाशी काहीही संबंध नाही. त्यांनी लिहिले, “मीडियामध्ये बातम्या आल्या आहेत की ईडीने माझी क्लायंट शिल्पा शेट्टी कुंद्रावर छापा टाकला आहे. या बातम्या खऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या नाहीत. माझ्या सूचनेनुसार शिल्पा शेट्टी कुंद्रावर ईडीचा कोणताही छापा पडलेला नाही कारण तिचा कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याशी संबंध नाही”.