Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, एकीकडे अर्जुन सायलीला त्याच्या मनातील भावना कशा सांगायच्या याचा प्रयत्न करतो. तर सायली देखील रोमँटिक गाणी ऐकवत अर्जुन समोर प्रेम व्यक्त करते. मात्र अर्जुनला सायलीच्या या भावना कळतच नाहीत. त्यामुळे सायली खूप नाराज होते. तर इकडे प्रतिमाने महीपतला पाहिलेलं असतं त्यामुळे प्रतिमासमोर तिचा भूतकाळ आलेला असतो. प्रतिमा रविराज आणि सुमनला काही वर्षांपूर्वी एका माणसाने माझ्या तोंडावर जळणाऱ्या लाकडांने वार केला आणि त्यामुळेच माझ्या चेहऱ्यावर ही खूण आली असं सांगते. यावर रविराज या मारेकऱ्याला काही करुन शोधून काढायचं असं ठरवतो.
रविराज प्रतिमाला प्रश्न विचारतो मात्र प्रतिमा त्या प्रश्नांची उत्तर काही देऊ शकत नाही. तेव्हा रविराज ठरवतो की, उद्याच्या उद्या मी स्केच आर्टिस्टला बोलावून घेतो. जेणेकरुन प्रतिमाच्या मारेकऱ्याबद्दल काहीतरी पुरावा हाती लागेल. प्रिया व नागराजचं पितळ उघडं पडणार म्हणून ते खूप घाबरतात. महिपतला प्रतिमाने ओळखलं आहे हे त्यांच्या लक्षात येतं. त्यामुळे प्रतिमाचा काही करुन गेम खल्लास केला पाहिजे असं त्या ठरवतात आणि उद्या प्रतिमा उठलीच नाही पाहिजे म्हणून तिच्या दुधात झोपेच्या गोळ्या मिक्स करायचं ठरवतात.
आणखी वाचा – “नाग को नचाने के लिये…”, लग्नात रेश्मा शिंदेचा नवऱ्यासाठी भन्नाट उखाणा, म्हणाली, “शादी हो गयी…”
प्रिया दुधात झोपेच्या गोळ्या मिक्स करत असते तेव्हा तिथे सुमन येते. सुमन सांगते की, मी वहिनीसाठी दूध घेऊन जाते मात्र प्रिया तिला सांगते की, तू जा. मी आईसाठी दूध घेऊन येते. प्रिया प्रतिमासाठी दूध घेऊन जाते तेव्हा प्रतिमा काहीच खायचं प्यायचं नाहीये असं म्हणत त्रागा करते. आणि तो दुधाचा ग्लास जोरात खाली ढकलून देते. दुधाचा ग्लास खाली पडतो तेव्हा प्रियाने दुधात मिसळलेल्या झोपेच्या गोळ्या नीट मिसळलेल्या नसतात त्यामुळे त्या गोळ्या रविराजच्या निदर्शनास येतात. रविराज प्रियाला त्या गोळ्यांबद्दल विचारतो तेव्हा प्रिया बाजू सांभाळत दूध गोड व्हायला मी फुटाणे घातले असल्याचं सांगतो. रविराजही प्रियावर विश्वास ठेवतो. त्यामुळे प्रिया थोडक्यात बचावते.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : किर्लोस्करांची सून होण्यास अनुष्काचा होकार असेल का?, पारूची घालमेल सुरु, मोठा ट्विस्ट
दुसरीकडे सायलीला आपल्या मनातलं कसं सांगायचं याचा विचार करुन अर्जुन वैतागलेला असतो. तो मध्यरात्री चैतन्यच्या खोलीत जाऊन त्याला आयडिया विचारतो. त्यानंतर दोघेही खाली येतात. तेव्हा पूर्णा आजी त्यांना विचारते, तुम्ही अजून काम करत बसला आहात का?, पूर्णा आजीला पाहून अर्जुनला आयडिया सुचते की, मी केस संदर्भात प्रश्न करत सायलीला आपलं प्रेम कसं दाखवायचं, याबाबत विचारतो. तेव्हा पूर्णा आजी जुने दिवस आठवत ती अर्जुनच्या आजोबांना कसे इम्प्रेस करायची याबद्दल सांगते.