Nikhil Chavan Anushka Sarkate Wedding : अभिनेत्री अनुष्का चव्हाण आणि अभिनेता निखिल चव्हाणची लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आज निखिल व अनुष्का लग्नबंधनात अडकणार आहेत. अशातच लग्न घटिका समीप येताच साऱ्यांचीच उत्सुकता वाढली आहे. निखिल व अनुष्का यांच्या लूककडे आणि लग्नमंडपातील एंट्रीकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहील आहे. अशातच समोर आलेल्या अनुष्का व निखिलच्या हटके एंट्रीच्या व्हिडीओने लक्ष वेधलं आहे. अशी एंट्री होणे नाही, हे वाक्य खोडून काढत चव्हाण आणि सरकटे कुटुंबीयांनी राडा केला.
भर मंडपात डोक्यावर तुळस, हाती झेंडा घेत चक्क वारी थीम करत निखिल व अनुष्काची एंट्री झाली. अर्थात सोशल मीडियावर या एंट्रीचे व्हिडीओ पडताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांनी त्यांच्या या लग्नसोहळ्याचे, वारी थीमचे कौतुक केले. या सोहळ्यात आणखी एक गोष्ट लक्षवेधी ठरली ती म्हणजे अनुष्काचा लूक. नवऱ्या मुलीच्या लूकमध्ये अनुष्का खूपच सुंदर दिसत होती. गडद गुलाबी रंगाची नऊवारी साडी तिने नेसली होती. आणि त्यावर सुंदर असे पारंपरिक अलंकार घातले होते.
निखिल अनुष्काच्या लग्नात फुलांचे तोरण, चार खांब असलेलं मोठं मंडप, फुलांची सप्तपदी असं सर्वच भव्य असल्याचं दिसत आहे. रेड आणि गोल्डन मंडप अशी या मंडपाची थीम आहे. साऊथ इंडियन वाईब देणार असं हे लग्नमंडप सजलं आहे. लवकरच ही जोडी विवाहबंधणात अडकणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून याची झलक सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. निखिल व अनुष्काच्या मेहंदी, हळदी, संगीत समारंभाचे अनेक फोटो समोर आले. कुटुंबीय, जवळचे नातेवाईक व कलाक्षेत्रातील मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांच्या हळदीचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला.




