गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आली लग्नघटिका समीप! निखिल-अनुष्काच्या लग्नाचा मंडप सजला, छत्रपती संभाजीनगर मधील ‘या’ रिसॉर्टमध्ये पार पडणार शाही लग्नसोहळा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 24, 2026 | 11:05 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nikhil Chavan Anushka Sarkate Wedding

आली लग्नघटिका समीप! निखिल-अनुष्काच्या लग्नाचा मंडप सजला, छत्रपती संभाजीनगर मधील ‘या’ रिसॉर्टमध्ये पार पडणार शाही लग्नसोहळा

Nikhil Chavan Anushka Sarkate Wedding : सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे यांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून याची झलक सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत असताना अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. काही वेळातच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. दोन दिवसापासून निखिल व अनुष्का यांच्या लग्नाआधीच्या विधींचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. अखेर आज ही जोडी लगीनगाठ बांधताना दिसणार आहे.

निखिल व अनुष्काच्या मेहंदी, हळदी समारंभाचे अनेक फोटो समोर आले. कुटुंबीय, जवळचे नातेवाईक व कलाक्षेत्रातील मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांच्या हळदीचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला. अखेर आता निखिल व अनुष्का विवाहबंधनात अडकण्यास सज्ज झाले आहेत. नुकताच निखिल व अनुष्काच्या लग्नाच्या सजलेल्या मंडपाचा फोटो समोर आला आहे. निसर्गरम्य वातावरणात अगदी शाही थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका रिसॉर्टमध्ये त्यांचा विवाहसोहळा उरकणार आहे. अजंता अँबेसेडॉर येथे निखिल व अनुष्काच लग्न होणार आहे.

आणखी वाचा – निखिल-अनुष्का हळदीत बेभान होऊन नाचले, मराठी कलाकारांचाही तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

समोर आलेल्या लग्नमंडपाच्या झलकने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अगदी राजेशाही थाटमाट यावेळी पाहायला मिळत आहे. फुलांचे तोरण, चार खांब असलेलं मोठं मंडप, फुलांची सप्तपदी असं सर्वच भव्य असल्याचं दिसत आहे. रेड आणि गोल्डन मंडप अशी या मंडपाची थीम आहे. साऊथ इंडियन वाईब देणार असं हे लग्नमंडप सजलं आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Nikhil Chavan Anushka Sarkate Wedding

डोक्यावर तुळस, हाती झेंडा आणि…; अनुष्काचा लग्न लूक सगळेच पाहत राहिले, एंट्री पाहून व्हाल थक्क

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.