बॉलिवूडमधील ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री अदा शर्मा खूप चर्चेत आली. अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना बघायला मिळतात. मात्र सध्या ती तिच्या कोणत्याची चित्रपट किंवा व्हिडीओमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ‘महाकुंभमेळा २०२५’मध्ये अदा सहभागी होणार आहे. याबद्दलची एक माहिती समोर आली आहे. महाकुंभ मेळा सोमवारी १३ जानेवारी पासून सुरु झाला आहे. हा मेळा २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत असणार आहे. या कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी भाविक सहभागी होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. (ada sharma perform at mahakumbh 2025)
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी महाकुंभ मेळ्यात मनोरंजनचा आस्वाददेखील घेता येणार आहे. अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर हे कलाकार सहभागी होणार असून हरीहरन, शंकर महादेवन, मोहित चौहान, कैलाश खेर, कविता सेठ, शान, राहुल देशपांडे, महेश काळे, देवकी पंडित, शान हे गायकदेखील मेळ्याची शोभा वाढवणार आहेत. अशातच आता अदादेखील तिची कला सादर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अदा ही मोठी शिवभक्त आहे. तिला शिव तांडव स्रोत्र पूर्ण पाठ असून तिचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करताना बघायला मिळते.
यावेळी ती ‘महाकुंभमेळा २०२५’मध्ये शिव तांडव स्रोत्रावर परफॉर्म करताना दिसणार आहे. त्यामुळे तिचे चाहते खूपच खुश असलेले दिसून येत आहेत. तसेच तिच्या परफॉर्मन्सकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. अदा ही शास्त्रीय नृत्यामध्ये पारंगत आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात.
दरम्यान अदाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, २००८ साली रजनीश दुग्गलच्या ‘१९२०’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिचे अनेक चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले. २०२३ मध्ये आलेला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे अधिक प्रसिद्धी मिळाली. ‘कमांडो २’, ‘हसी तो फसी’, ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ या चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.