Sunita Ahuja On Govinda : बॉलिवूडच्या सुपरस्टारपैकी एक म्हणजे गोविंदा. चाहत्यांना त्याच्या नृत्याचे आणि चित्रपटांचे प्रचंड वेड आहे. गोविंदा त्याच्या व्यावसायिक आयुष्यात खूप यशस्वी आहे. तर अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्याने सुनीता आहुजासह लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. हे जोडपे अनेकदा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. या सगळ्या दरम्यान गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने अभिनेत्याबद्दल असे काही भाष्य केले आहे की, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुनीता यांनी गोविंदा बाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. आणि त्या असं का म्हणाल्या आहेत असा प्रश्न साऱ्यांना सतावत आहे.
‘पिंकविला हिंदी रश’शी बोलताना गोविंदाची पत्नी सुनीता यांनी खुलासा केला आहे की, ते बहुतेक वेगळे राहतात. सुनीता आपल्या मुलांसह फ्लॅटमध्ये राहते, तर गोविंदा अपार्टमेंटसमोरील बंगल्यात राहतो. सुनीता म्हणाली, “आमची दोन घरं आहेत, आमच्या अपार्टमेंटसमोर एक बंगला आहे. माझे मंदिर आणि माझी मुले फ्लॅटमध्ये आहेत. जेव्हा त्याला त्याच्या मीटिंगला उशीर होतो तेव्हा आम्ही फ्लॅटमध्ये राहतो. त्याला संवाद साधायला आवडते म्हणून तो १० लोकांना एकत्र करेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल. मी, माझा मुलगा आणि माझी मुलगी एकत्र राहत असताना, आम्ही क्वचितच बोलतो कारण मला असे वाटते की तुम्ही जर जास्त बोलले तर तुम्ही तुमची शक्ती वाया घालवत आहात”.
आणखी वाचा – “माणूस सरड्यासारखा रंग बदलतो आणि…”, पत्नी सुनीता आहुजाच्या बोलण्याने गोविंदा नाराज, काय आहे भांडणाचे कारण?
सुनीताने असेही सांगितले की, गोविंदा नेहमीच काम करत असतो आणि त्याच्याकडे रोमान्ससाठी वेळ नसतो. ती म्हणाली, “मी त्याला सांगितले आहे की त्याने पुढच्या जन्मात माझा नवरा बनू नये. तो रजेवर जात नाही. मी एक अशी व्यक्ती आहे जिला माझ्या पतीबरोबर बाहेर जाऊन रस्त्यावर पाणीपुरी खायची इच्छा आहे. त्याने कामात खूप वेळ घालवला. आम्हा दोघांपैकी कोणीही चित्रपट पाहायला बाहेर गेल्याचे एकही प्रसंग मला आठवत नाही”. सुनीता पुढे म्हणाली, “आता मला माहीत नाही की तो तसा झाला आहे की नाही. लोक तुमच्या पाठीमागे काय करतात हे तुम्हाला कधीच कळत नाही. कोणत्याही माणसावर कधीही विश्वास ठेवू नका. लोक सरड्यासारखे रंग बदलतात. आमच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. पूर्वी तो कुठेही जात नव्हता, आता मला माहीत नाही”. सुनीताने गोविंदाने फसवणूक केल्याची खिल्ली उडवली आणि म्हणाली, “आमच्या लग्नानंतर मी खूप सुरक्षित होते, आता मी नाही, म्हणजे काय तर वयाच्या साठीनंतर माणसे सुद्धा चिडखोर होतात हे खरे नाही का?. पुढे काय करायचे ते कळत नाही आहे”.
आणखी वाचा – क्रिकेटर युजवेंद्र चहल व धनश्री वर्मा घटस्फोट घेणार?, नक्की दोघांमधील वाद काय?, चर्चांना उधाण
सुनीता आहुजा पुढे म्हणाल्या, “आधी मला पर्वा नव्हती, पण आता तो साठीपेक्षा मोठा आहे. मला भीती वाटते. तो लहान असताना इतकं काम करायचा की त्याला अफेअर्ससाठी वेळच नसायचा, पण आता तो काहीच करत नाही त्यामुळे मला भीती वाटते”. गोविंदा आणि सुनीता यांचा विवाह १९८७ मध्ये झाला होता. त्यावेळी सुनीता फक्त १८ वर्षांची होती. या जोडप्याला यशवर्धन आहुजा आणि टीना आहुजा अशी दोन मुले आहेत.