रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माणूस सरड्यासारखा रंग बदलतो आणि…”, पत्नी सुनीता आहुजाच्या बोलण्याने गोविंदा नाराज, काय आहे भांडणाचे कारण?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 4, 2025 | 1:03 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sunita Ahuja On Govinda

पत्नी सुनीता आहुजाच्या बोलण्याने गोविंदा नाराज, काय आहे भांडणाचे कारण?

Sunita Ahuja On Govinda : बॉलिवूडचा हिरो नंबर 1 गोविंदा त्याच्या खास स्टाइलसाठी ओळखला जातो. अर्थात हा अभिनेता सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असला तरी अनेकदा तो चर्चेत राहतो. अलीकडेच त्याची पत्नी सुनीता आहुजा आपल्या पतीबद्दल भाष्य करताना दिसली. यामुळे गोविंदा व त्याची पत्नी चर्चेत आली आहे. अभिनेत्याच्या पत्नीने म्हटले आहे की, लग्नाच्या अनेक वर्षानंतर तिचा दृष्टीकोन बदलला आहे. आता तिला या नात्यात आत्मविश्वास वाटत नाही. तिच्या या वक्तव्यावरुन लोक असा अंदाज लावत आहेत की त्यांच्या नात्यात कोणताही वाद तर सुरु नसावा. सध्या सुनीता आहुजा यांनी अभिनेता गोविंदाबाबत केलेलं हे वक्तव्य अधिक चर्चेत आलं आहे.

मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सुनीता आहुजाने सांगितले की, तिच्या करिअरच्या शिखरावर असताना तिला गोविंदाबद्दल सुरक्षित वाटत होते, तर त्या दिवसांत अभिनेत्याच्या अफेअरच्या डझनभर बातम्या येत होत्या. पिंकविलाशी झालेल्या संवादात सुनीता अहुजा म्हणाली, “पूर्वी मी खूप सुरक्षित होते, आता नाही आहे. वयाच्या ६० नंतर माणसे सुद्धा चिडखोर होतात हे खरे नाही का?. पुढे काय करायचे ते कळत नाही आहे”. तिला पुढे विचारण्यात आले की तिच्या पतीबद्दलच्या अफवांचा तिच्यावर परिणाम झाला आहे का?. या प्रश्नाचं उत्तर देत ती म्हणाली, “नाही. त्या दिवसात मला त्याचे बीजी शेड्यूल समजले होते”. मात्र, या विषयावर ती पुढे म्हणाली की, “आता अशा बातम्या ऐकायला मिळाल्या तर कदाचित अस्वस्थ वाटू लागेल”.

आणखी वाचा – “तुम्ही गोमांस खाणाऱ्याला राम मंदिराच्या उद्घाटनाला आमंत्रित करता”, सुप्रसिद्ध गायकाने रणबीर कपूरवर साधला निशाणा, म्हणाला, “गायीला…”

आपला मुद्दा पुढे चालू ठेवत ती म्हणाली, “मी पुन्हा सांगतेय कधीच कोणावर विश्वास ठेवू नका. तो माणूस आहे. आणि तो सरड्यासारखा रंग बदलतो”. सुनीता यांनी गमतीत असे म्हटलं असलं तरी, या जोडप्याचे खूप स्ट्रॉंग बॉण्ड आहेत. या दोघांचे लग्न ११ मार्च १९८७ रोजी झाले होते आणि त्यांना टीना आहुजा आणि यशवर्धन अशी दोन मुले आहेत. हे दोघेही अनेकदा टीव्ही शोमध्ये पाहुण्यांच्या भूमिकेत दिसतात.

आणखी वाचा – चालू नाटकात शरद पोंक्षे सर्वकाही विसरल्याच्या ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची भावुक प्रतिक्रिया, म्हणाली, “जे काही झालं ते…”

या मुलाखतीत सुनीता आहुजा अभिनेता वरुण धवनबद्दलही बोलल्या. वरूण धवनची गोविंदाशी तुलना करताना सुनीता म्हणाली, “ते बोलतात, तुलना करतात पण ते का बोलतात ते मला समजत नाही. त्यालाही वाईट वाटत असेल की तो तुलना सलमानशी करतो, पण मला समजत नाही का?”. बेबी जॉन अभिनेत्याबद्दल ती पुढे म्हणाली की, “तो लहानपणापासूनच खेळकर होता”.

Tags: bollywood newssunita ahuja big statementSunita Ahuja On Govinda
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Pooja Sawant Home

Video : पूजा सावंतचं ऑस्ट्रेलियातील घर पाहून आई-वडील भारावले, पहिल्यांदाच पाहिला लेकीचा संसार, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.