Vicky Kaushal Photos : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या ‘छावा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात तो संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. ज्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. आता त्याने घेतलेल्या या मेहनतीची एक झलक त्याने चाहत्यांसह दाखवली आहे. विकी लवकरच ‘छावा’ चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. हा एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे. ज्यासाठी विकीने खूप मेहनत घेतली. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटासाठी विकी कौशलने विशेष मेहनत घेतलेली पाहायला मिळाली. जवळपास ७-८ महिने तो तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकला.
खरंतर, विकी कौशल या चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. ही भूमिका परिपूर्ण करण्यासाठी अभिनेत्याने जिममध्ये खूप मेहनत घेतली आहे. विकीने आता त्याच्या चाहत्यांना या मेहनतीची झलक दाखवली आहे. अभिनेत्याने चित्रपटासाठी केलेल्या त्याच्या कसरतीचे फोटो शेअर केले आहेत. या भूमिकेसाठी जिममध्ये मेहनत घेतानाचे त्याचे फोटो तुफान व्हायरल होत असून प्रेक्षक त्याच्या या मेहनतीचं कौतुक करत आहेत.
हे फोटो शेअर करताना विकीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जुने चांगले #छावा तयारीचे दिवस. मी तुम्हा सर्वांना १४ फेब्रुवारी रोजी भेटेन”. या चित्रपटात विकी कौशल पहिल्यांदाच अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. चाहतेही या जोडीला एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. विकी जयपूर आणि बिहारमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला होता. त्या अभिनेत्याचे ते फोटोही व्हायरल झाले. तर सध्या अभिनेता मुंबईत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
आणखी वाचा – ‘दहावी-अ’च्या पुढील भागात शाळेत पार पडणार झेंडावंदन, प्रभातफेरीही निघणार, यादरम्यान कोणता अडथळा येणार का?
काही दिवसांपूर्वी विकीचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला. ट्रेलरमधील गाण्यात छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळताना दाखवले हे अनेकांना पटले नाही यावरुन बरेच मतभेद झाले आणि अखेर दिग्दर्शकाने हा सीन काढून टाकण्याचे ठरवले. यानंतर आता प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या १४ फेब्रुवारीला हा चित्रपट सर्वत्र मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.