‘इट्स मज्जा’च्या नवीन ‘दहावी-अ’ या वेबसीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या लोकप्रिय सीरिजचे एकूण दहा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सीरिजमध्ये एकामागून एक येणाऱ्या ट्विस्टसाठी प्रेक्षक उत्सुक असतात. अशातच नुकतंच शाळेत रक्षाबंधन पार पडलं. या रक्षाबंधनसाठी आधी शाळेत जायचं नाही असं विक्या, किरण्या व मध्या ठरवतात. मात्र आभ्या त्यांना शाळेत जाण्याविषयी सुचवतो. खरंतर शाळेत जाण्याची भीती फक्त मध्यालाच असते. कारण शाळेत गेल्यावर ज्योती त्याला राखी बांधेल ही भीती त्याला असते. पण शाळेत गेलो नाही तर आपलं अभ्यासाचे नुकसान होईल अशी भीती आभ्या सर्वांना दाखवतो. (Dahavi-A series daily updates)
शेवटी सर्वज शाळेत जातात. शाळेत जायच्या आधी मध्या रेश्माला आभ्याला राखी बांधण्यास सांगतो. पण रेश्मा त्याला नका देते. रेश्माच्या मनात आभ्याविषयी भावना असल्याने ती आभ्याला राखी बांधण्यास नकार देते. शिवाय मी त्याची मामेबहीण असल्याचेही सांगते. यानंतर सर्वजण मिळून शाळेत जातात. शाळेत जाताच मध्याला ज्योती राखी बांधेल ही भीती असते. पण ही भीती खोटी ठरते. शाळेत जाताच ज्योतीची पेन्सिल हरवलेली असते तेव्हा मध्या ज्योतीला ती पेन्सिल शोधण्यास मदत करतो. पण पेन्सिल मिळत नसल्याने मध्या तिला त्याची पेन्सिल देतो.
आणखी वाचा – “जाण्याची वेळ झाली”, अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा, चाहते अस्वस्थ, म्हणाले, “काय झाले सर?”
पुढे शाळेत रक्षाबांधन साजरं होतं तेव्हा केवडा मध्याला राखी बांधत नाही. तर ज्योती किरण्याला राखी बांधायला जाते तेव्हा मध्या लपतो. ज्योती राखी बांधेळ या भीतीने तो लपतो. पण ज्योती त्याला राखी बांधत नाही, त्याऐवजी ती त्याला चॉकलेट देते. यामुळे मध्या चांगलाच खुश होतो. तर यामुळे मध्याच्या मनात जी भीती होती तीसुद्धा नाहीशी होते. अशातच पुढे कांबळे सर पाटील मॅडमणा राखी बांधणार नाही का असं विचारतात. यावर पाटील मॅडम त्यांना मला तुमची मैत्रीण व्हायचं असल्याचे सांगतात. पण पतील मॅडमकडून मैत्रीचा सल्ला ऐकताच कांबळे सर त्यावर काहीच प्रतिरक्रिया न देता तिथून निघून जातात.
आणखी वाचा – बायकोसाठी फोटोग्राफर बनला कुशल बद्रिके, एका क्लिकसाठी मागे मागे फिरत राहिला अन्..; धमाल व्हिडीओ व्हायरल
अशातच आता पुढील भागात शाळेत झेंडावंदन होणार आहे. यानिमित्त शाळेत प्रभातफेरीही निघणार आहे. त्यामुळे आता यात काय खास पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तसंच आभ्या व मध्याला केवडा आणि ज्योतीने राखी बांधली नाही. त्यामुळे त्यांच्यातील खास नात्याला ही वेगळीच सुरुवात होणार आहे? हे जाणून घेण्यासाठीदेखील प्रेक्षक उत्सुक आहेत.