Rajiv Thakur On Kapil Sharma : कपिल शर्माच्या वर्तनावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. त्याचे वर्णन गर्विष्ठ आणि असभ्य असे केले आहे. विशेषतः सुनील ग्रोव्हरबरोबरच्या भांडणानंतर कपिलवर अहंकारी झाल्याचा आरोप झाला आहे. पण राजीव ठाकूर असे मानत नाहीत. तो अलीकडेच कपिलच्या बचावात भाष्य करताना दिसला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, “कपिल शर्मावर खूप दबाव आहे”. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा भाग असलेल्या राजीव ठाकूरने कपिलच्या अहंकाराबद्दल आणि सुनील ग्रोव्हरशी झालेल्या त्याच्या भांडणाबद्दल भाष्य केले.
राजीव म्हणाला की, जर तो त्याच्याइतका यशस्वी झाला तर तो वेडा होईल. राजीव ठाकूर म्हणाला की, “हा शो गेल्या १०-१२ वर्षांपासून कपिलच्या मेहनतीमुळे सुरु आहे, त्याच्या अहंकारामुळे नाही”. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राजीव ठाकूर म्हणाला, “तो खूप दबावाखाली आहे आणि लोकांना ते समजत नाही. दोन ते अडीच तासांची पटकथा कोणाला आठवते? तो कधीही डगमगला नाही. कधीही अडखळला नाही, एकदाही नाही. तो त्याच्या प्रत्येक नोंदीत लक्ष घालतो”.
राजीव ठाकूर पुढे म्हणाला, “परफॉर्म करण्याव्यतिरिक्त, त्याला पाहुण्यांचे स्वागत करावे लागते आणि त्यांना आरामदायी वाटावे यासाठीही विशेष लक्ष द्यावे लागते. एवढेच नाही तर शोमध्ये काम करण्यासाठी चॅनेलच्या क्रिएटिव्ह टीमबरोबर बसावे लागते. जर हा शो १०-१२ वर्षांपासून यशस्वीरित्या चालू असेल तर ते त्याच्या प्रयत्नांचे आणि कठोर परिश्रमांचे परिणाम आहे. हे अहंकारामुळे घडत नाहीये. जर मी त्याच्याइतका प्रसिद्ध झालो तर मी वेडा होईन”.
आणखी वाचा – ‘दहावी-अ’च्या पुढील भागात शाळेत पार पडणार झेंडावंदन, प्रभातफेरीही निघणार, यादरम्यान कोणता अडथळा येणार का?
त्यानंतर राजीव ठाकूर यांनी कपिल शर्माचे कौतुक केले आणि म्हटले की, त्याच्यासारख्या प्रसिद्धीला कोणीही हाताळू शकत नाही. राजीव म्हणाला, “कपिल शर्माच्या यशात माझा ५%ही वाटा नाही, तरीही मी अनेक वेळा चाहत्यांवर चिडतो. कपिल शर्मा त्याच्या चाहत्यांना किती प्रेमाने भेटतो ते तुम्ही बघायला हवे”.