बॉलिवूडमधील ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट जुना झाला तरीही आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. १९९९ साली आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन इव्हीव्ही सत्यनारायण यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका आहे. या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आजही हा चित्रपट टेलिव्हिजनवर दाखवला जातो. या चित्रपटातील संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या चित्रपटातील सर्वच भूमिका व कलाकार आजही प्रेक्षकांच्या खूप लक्षात आहेत. यामध्ये अमिताभ म्हणजे हिरा यांच्या पत्नीची भूमिका सौंदर्या या दाक्षिणात्य अभिनेत्रीने साकारली होती. तसेच यामध्ये अनुपम खेर, कादर खान, शिवाजी साटम यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. मात्र यामध्ये एक भूमिका अधिक लक्षवेधी ठरली ती म्हणजे गौरीची. (gauri in suryavamsam)
‘सूर्यवंशम’ चित्रपटामध्ये हिरा ठाकूरच्या प्रेयसीची म्हणजे गौरीची भूमिका सकारणारी अभिनेत्री म्हणजे रचना बॅनर्जी. २ ऑक्टोबर १९७२ रोजी रचना यांचा जन्म झाला. त्यांचे नाव आधी झुमझुम बॅनर्जी होते. मात्र मनोरंजन क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी स्वतःचे नाव बदलून रचना बॅनर्जी ठेवले. त्यांनी अनेक बंगाली, ओडिसी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तसेच काही तमिळ, तेलगू व कन्नड चित्रपटांमध्येदेखील दिसून आल्या. त्यांनी प्रसेनजीत चटर्जी व चिरंजीवी यांच्याबरोबरदेखील भूमिका साकारल्या आहेत.
सध्या त्या अभिनयामधून बाहेर आलेल्या दिसत आहेत. त्या आता एक उद्योजिका असून त्यांचा साडी व कॉस्मेटिक ब्रॅंडदेखील आहे. त्याचप्रमाणे त्यान २०२४ साली लोकसभा निवडणुकीसाठीदेखील उभ्या होत्या. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या TMC पार्टीकडून उमेदवार म्हणून उभ्या होत्या. हुगळी येथून त्यांनी BJP च्या लॉकेट चटर्जी यांचा पराभव केला होता.
आजवर रचना यांनी ३० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्यांना अभिनयक्षेत्रात जास्त यश मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांनी मनोरंजन क्षेत्राला राम-राम केला. दरम्यान त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्या सह-कलाकार सिद्धांत मोहपात्रा यांच्याबरोबर लग्नबंधनात अडकल्या. मात्र २००४ साली त्यांचा घटस्फोट झाला. नंतर २००७ साली त्यांनी प्रबल बासु यांच्याबरोबर लग्न केले पण २०१६ साली ते वेगळे झाले. त्यांना एक मुलगादेखील आहे. सोशल मीडियावरदेखील रचना अधिक सक्रिय असतात. त्यांचे ८७३k फॉलोअर्स आहेत.