Aamir Khan Statement : बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याचा मुलगा जुनैद खानच्या आगामी ‘लव्हयापा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्यादरम्यान आमिरने स्वत:ला रोमँटिक व्यक्ती म्हटले. त्याच्या म्हणण्यावर कोणाचा विश्वास बसत नसेल तर त्याच्या दोन बायका रीना व किरण यांना याबाबत विचारु शकता, असा दावाही त्याने यावेळी केला. ‘लवयापा’मध्ये खुशी कपूरचीही भूमिका आहे आणि हा चित्रपट ‘इमर्जन्सी’ आणि ‘फतेह’बरोबर १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत असल्याची माहिती आहे. आमिर खान बरेचदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. अभिनेता अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलला आहे.
या कार्यक्रमात आमिर खान म्हणाला, “खरं तर मी खूप रोमँटिक माणूस आहे. मी आई शपथ घेऊन सांगतो की, मी खूप रोमँटिक आहे. हे सांगायला खूप विचित्र वाटतं पण तुम्ही माझ्या दोन्ही बायकांना याबद्दल विचारु शकता. मी खरं सांगतोय, कारण मी त्या प्रकारचा आहे”. आमिर खानचे लग्न आणि घटस्फोट नेहमीच चर्चेत राहील आहे. त्याने १९८६ मध्ये रीना दत्ता यांच्याशी पहिले लग्न केले आणि त्यांना जुनैद व आयरा ही दोन मुले आहेत. १६ वर्षांनंतर २००२ मध्ये ते वेगळे झाले. आमिरने २००५ मध्ये चित्रपट निर्माता किरण रावशी लग्न केले आणि त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे. लग्नाच्या १५ वर्षानंतर, त्यांनी २०२१ मध्ये त्यांचे विभक्त होण्याची घोषणा केली, परंतु त्यांच्या मुलाला एकत्र वाढवण्याचा निर्णय दोघांनी घेतला.
आणखी वाचा – “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिता वालावलकरसाठी नवऱ्याचा हटके उखाणा, केळवण स्पेशल व्हिडीओ समोर
आयरा आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नात संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. आयराची आई आणि आमिरची दुसरी पत्नी किरण यांनी मिळून लग्नाची जबाबदारी घेतली. त्याचे फोटो व्हायरल झाले होते. याआधीही आयराने इंस्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये रीना व किरण अनेकदा एकत्र दिसत आहेत. आमिरही त्यांच्याबरोबर आहे. त्याचे दोन्ही पत्नींबरोबर चांगले संबंध आहेत.
आणखी वाचा – ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर टिकू तलसानियांची तब्येत कशी? लेकीने दिली मोठी माहिती, “माझे पप्पा…”
दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘लाल सिंह चड्ढा’ नंतर आमिर ‘सीतारे जमीन पर’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये अनेक चित्रपट बनत आहेत. ज्यात प्रीती झिंटा आणि सनी देओलचा ‘लाहोर 1947’ देखील आहे.