बॉलिवूड अभिनेते टिकू तलसानिया यांचया प्रकृतीबद्दल ची बातमी आली आणि त्यांच्या चाहत्यांसह अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तातडीनी रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समोर आले. यावर अनेकांनी काळजीही व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर काही वेळाने त्यांच्या पत्नीने टिकू यांना हृदयविकाराचा झटका नाही तर ब्रेन स्ट्रोक आल्याचे सांगितलं. तसंच त्यांच्या तब्येतीची बातमीही दिली. अशातच टिकू यांच्या मुलीनेही तब्येतीबद्दलची मोठी माहिती दिली आहे. टिकू यांची मुलगी शिखा तलसानियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वडिलांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. (tiku talsania health update)
शिखाने तलसानियाने या पोस्टमधून सांगितले आहे की, तिचे वडील टिकू यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी वडिलांच्या तब्यतेची विचारपूस करणाऱ्या आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभारही मानले आहेत. शिखा तलसानियाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिच्या वडिलांच्या तब्येतीची अपडेट दिली आहे. या पोस्ट मध्ये तिने लिहिले आहे की, “तुमच्या प्रार्थना आणि काळजीबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हा सर्वांसाठी हा खूप भावनिक काळ होता. पण आता मला सांगायला आनंद होत आहे की, माझे पप्पा आता बरे होत आहेत”.

आणखी वाचा – “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिता वालावलकरसाठी नवऱ्याचा हटके उखाणा, केळवण स्पेशल व्हिडीओ समोर
यापुढे तिने पुढे कोकिलाबेन रुग्णालयातील कर्मचारी आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. टिकू तलसानिया यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची पहिली बातमी आली. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांची पत्नी दीप्ती तलसानिया यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांना हृदयविकाराचा झटका नसून ब्रेन स्ट्रोक आला आहे. ते एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगला गेले होते, तिथे रात्री आठ वाजताच्या च्या सुमारास त्यांची तब्येत बिघडू लागली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
दरम्यान, टिकू तलसानिया यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ते इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. बॉलीवूडमधील जवळपास प्रत्येक मोठ्या अभिनेत्याबरोबर त्यांनी काम केले आहे. ‘कुली नंबर वन’, ‘राजा हिंदुस्तानी’, ,अंदाज अपना अपना’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘,हंगामा, ‘धमाल’, ‘ढोल’ यांसारख्या मोठ्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच, ‘विकी विद्याच्या वो वाला व्हिडीओ’मध्ये टिकू आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवताना दिसले होते.