प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीबाबत नुकतीच अपडेट समोर आली आहे. अभिनेत्याच्या अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली असल्याचं समोर आलं. सयाजी यांची अँजिओप्लास्टी तपासणी केल्यानंतर त्यांच्या हृदयातील तीन रक्तवाहिन्यांपैकी एका रक्तवाहिनीमध्ये ९९ टक्के ब्लॉक आढळला. त्यानंतर लगेचच त्यांच्यावर सातारा येथील इस्पितळात उपचार करण्यात आले. (sayaji shinde on health)
सयाजी शिंदे यांच्यावरील उचारादरम्यान त्यांच्या हृदयात असलेला एक ब्लॉग काढलेला असून आता त्यांच्या प्रकृती उत्तम आहे. याआधी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सयाजी यांच्या तब्येतीबाबत अपडेट दिली होती. त्यानंतर आता थेट सयाजी यांनी सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. शेअर केलेला व्हिडीओ सयाजी यांनी हॉस्पिटलमध्ये शूट करुन इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या तब्येतीबाबतची अपडेट चाहत्यांसह शेअर करताना दिसत आहेत.
सयाजी यांनी व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं की, “नमस्कार. माझे सगळे रसिक प्रेक्षक, हितचिंतक ज्यांच्या नेहमी मला खूप शुभेच्छा असतात. त्या सर्वांना मला हे सांगायचं आहे की, माझी तब्येत खूप चांगली आहे. पूर्वकाळजी म्हणून मी चेक केलं तेव्हा एक ब्लॉकेज निघालं. आणि त्यावर उपचार घेऊन मी पूर्णतः ठीक झालो आहे. पुढे केव्हातरी हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता होती. पण पुढे आता काही होणार नसून पुढील दहा वर्ष मी चांगलं काम करणार आहे. आपल्या सेवेत पुन्हा रुजू होणार आहे. इन्स्टाग्राम, युट्युबवर गमतीजमती करु. सर्व बातम्या ज्या तुमच्या कानावर येत आहेत त्या जशाच तशा नाही आहेत. पण मी आता बरा आहे आणि आनंदी आहे. तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा आणि तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद”.
आणखी वाचा – देशमुखांच्या घरात पडणार फूट? संजनाने उभारली वेगळी गुढी, अनिरुद्धचा राग अनावर
सयाजी यांच्या प्रकृतीची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये काळजीच वातावरण सुरु असलेलं पाहायला मिळालं. तब्येतीची माहिती देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत, “नमस्कार, मी एकदम व्यवस्थित आहे, माझ्यावर प्रेम करणारे सर्व रसिक, माझे हितचिंतक सर्वांच्या शुभेच्छा माझ्याबरोबर असतात. आता काळजी करण्यासारखं काही नाही, लवकर तुमच्या मनोरंजनासाठी उपस्थित राहील धन्यवाद”, असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओवर सयाजी यांच्या चाहत्यांनी कमेंट करत तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे.