बॉलिवूड गायिका मोनाली ठाकूर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. आजवर मोनालीने हिंदी तसेच इतर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. मात्र एका वेगळ्याच कारणामुळे ती चर्चेत आली आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये ती तिचा कॉन्सर्ट मध्येच थांबवला आहे. इव्हेंट ओर्गनायजर्सच्या खराब व्यवस्थेमुळे तिने हा शो मध्येच सोडल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. यामध्ये ती चाहत्यांची माफी मागताना दिसत आहे. मोनालीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिच्या कॉन्सर्टमध्ये नक्की काय झालं ते आपण आता जाणून घेऊया. (monali thakur live concert)
सोशल मीडियावर मोनालीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये ती चाहत्यांची माफी मागताना दिसत आहे. तसेच ज्यांनी हा कॉन्सर्ट आयोजित केला त्यांच्यावर चिडलेलीदेखील दिसत आहे. ती म्हणाली की, “मी नाराज आहे. मी व माझी टीम परफॉर्म करण्यासाठी खूप खुश होतो. मात्र इथे असलेल्या सुविधांबद्दल मला काहीही बोलायचं नाही. ही इथल्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. मला हे सांगता पण नाही येणार की त्यांनी पैसे चोरण्यासाठी मंचावर काय करत आहेत ते”.
Singer #MonaliThakur’s recent concert in #Varanasi took an unexpected turn when mismanagement of the stage led to safety concerns. The poorly set up stage posed a risk of injury. As a result, Monali had to abruptly end the performance.
— Masala! (@masalauae) December 23, 2024
.
.#Bollywood #Singer #BollywoodSinger pic.twitter.com/Ou4Btou6JQ
पुढे ती म्हणाली की, “मी खूप सांगत आहे की मंच खराब असल्याने माझ्या पायाला जखम होऊ शकते. मला इतर डान्सर्स शांत राहण्यासाठी सांगत आहेत. पण इथेसगळंच बेकार आहे. तरीही आम्ही परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत आहोत कारण तुम्ही लोक माझ्यासाठी आला आहात आणि सगळ्यांना मी उत्तर देण्यासाठी बांधील आहे. पण मी माझा कॉन्सर्ट इथेच थांबवत आहे. पण पुन्हा मी इथे येईन. पण सगळी व्यवस्था मी स्वतः करेन”.
आणखी वाचा -प्रसिद्ध गायक शान यांच्या इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, नेमकं काय झालं?
दरम्यान मोनालीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एकाने लिहिले की, “जे कोणी मोनालीला दोषी म्हणत असतील त्यांनी कोलकत्ताचा कॉन्सर्ट आठवावा. चुकीची व्यवस्था तसेच व्हेंटिलेशन नसल्यामुळे केकेचा मृत्यू झाला होता”, अजून एकाने लिहिले की, “तिचा मुद्दा बरोबर आहे. लाईव्ह शो आहे. जखम होऊ शकते आणि नुकसानदेखील होऊ शकते. मोनालीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.