पडद्यावर घडणाऱ्या घडामोडींपेक्षा पडद्यामागे घडणाऱ्या काही रंजक गोष्टी जाणून घेण्यात प्रेक्षकांना व चाहत्यांना अधिक रस असतो. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांपर्यंत पडद्यामागच्या रंजक घटना, प्रसंगे किंवा काही किस्से शेअर करत असतात. अशा काही कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री तितीक्षा तावडे. तितीक्षा ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सोशल मीडियाबरोबरच तितीक्षाचे स्वत:चे एक युट्यूब चॅनेलदेखील आहे. तितीक्षा तावडे ही युट्यूबवरील व्लॉगच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील काही खास क्षण तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. (Titeeksha Tawde shared last day shooting)
सेटवरील मजामस्ती, आयुष्यातील काही खास क्षण, तसंच वैयक्तिक व कामावरील काही लेटेस्ट अपडेट्स तितीक्षा तिच्या या युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत असते. अशातच तितीक्षाची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि याच निरोपानिमित्त तिने एक खास व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनेलद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमधून तितीक्षाने मालिकेच्या शेवटच्या दिवसाच्या शूटिंगची संपूर्ण झलक दाखवली आहे. तसंच या व्हिडीओमध्ये तितीक्षाचा नवरा सिद्धार्थ तिला धीर देतानाचेही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – शिवानी सोनारची लगीनघाई सुरु, घरच्यांनी केलं साग्रसंगीत केळवण, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
या व्हिडीओमध्ये ती शेवटच्या दिवशी सेटवर लवकर पोहोचते आणि या खास दिवसासाठी ती ऐश्वर्या नारकरांनी भेट म्हणून दिलेला खास ड्रेस परिधान करते. यानंतर हळूहळू सेटवर सगळे येतात. यावेळी सर्वांच्याच डोक्यात हेच चालू असतं की, त्यांचा या सेटवरील शेवटचा दिवस आहे. पुढे नेत्रा कलाकारांचचे मेकअप कशाप्रकारे केले जाते याचीही झलक या व्हिडीओमधून दाखवते. त्यानंतर शतग्रीवच्या वधाचा सीन कसा शूट केला गेला? याचेही खास दृश्य ती यातून दाखवते. पुढे शेवटच्या सीनचे शूटिंग आणि त्यानंतर कलाकारांच्या सेलिब्रेशनची ही खास झलक तितीक्षाच्या या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. मालिकेच्या शेवट होत असल्याने साहजिकच सर्व कलाकार व तंत्रज्ञ मंडळी भावुक होतात.
आणखी वाचा – Paataal Lok Season 2 ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जयदीप अहलावतच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष
यानंतर निरोपाच्या क्षणी मालिकेचे दिग्दर्शक कलाकारांना त्यांच्या शेवटच्या प्रतिक्रिया विचारतात. यावेळी तितीक्षा, ऐश्वर्या यांसह सगळेच मंडळी भावुक होतात. मालिकेतील दोन लहान मुलींनाही रडू कोसळतं. त्यांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या असता, त्या रडू लागतात. यानंतर सेटवर कलाकारांकडून खास सलिब्रेशन केलं जातं. त्यानंतर अखेर नेत्रा म्हणजेच तितीक्षा या सेटची खास झळक प्रेक्षकांना दाखवते आणि या वास्तूला आता अखेरचा निरोप देते. तितीक्षाचा हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक म्हणूनही अश्रु अनावर होतात. दरम्यान, या व्हिडीओखालीही प्रेक्षकांनी भावुक कमेंट्स शेअर केल्या आहेत.