काही माहिन्यांपूर्वी सर्वांसमोर सातत्याने येणारं नाव म्हणजे ‘ऑरी’. ऑरी हा बॉलिवूडमधील प्रत्येक पार्टीमध्ये प्रत्येक कलाकाराबरोबर दिसून येतो. अंबानींच्या लग्नापासून ते अगदी अगदी कोणत्याही चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ऑरी हमखास असतो. त्याचं आणि स्टारकिड्सच तर अनोखं नातं आहे. प्रत्येक स्टारकिड्सबरोर ऑरी हा असतोच असतो. सातत्याने चर्चेत राहणारा हा ऑरी आता लवकरच चित्रपटातही झळकणार आहे. तो हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे. तेही संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटातून. यात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Orry Bollywood Debut)
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ऑरी आता ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात दिसणार आहे. पण त्याला पाहुणा कालकार म्हणून कास्ट करण्यात आले असल्याचे म्हटलं जात आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोणदेखील या चित्रपटात दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात ऑरी होमोसेक्श्युअल व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. ऑरी या चित्रपटात आलियाच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. आलिया भट्ट या चित्रपटात एका डान्सरच्या रोलमध्ये दिसेल. तर रणबीर कपूर आणि विकी कौशल हे आर्मी ऑफिसरची भूमिका निभावणार आहेत.
भन्साळींचा हा चित्रपट मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ऑरी हा इंटरनेट सेन्सेशन म्हणून ओळखला जातो. सोशल मीडियावर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे १.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर तो त्याच्या चाहत्यांसाठी बॉलीवूड पार्टीचे अनेक इनसाइड फोटोज शेअर करतो. तो प्रत्येक मोठ्या गायकाच्या मैफिलींनाही हजेरी लावतो आणि अनेक वेळा विचित्र पोशाख घालून पापाराझींसमोर हजर असतो.
दरम्यान, रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांच्या या चित्रपटात सोशल मीडिया सेन्सेशन ऑरीचीही एन्ट्री झाली आहे. त्यामुळे भन्साळींच्या चित्रपटात ऑरी झळकणार, हे समजल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ऑरीचे चाहते त्याला अभिनय करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे