बॉलिवूडमध्ये अनेक अशा जोड्या खूप प्रसिद्ध आहे. पण यामध्ये शबाना आजमी व तिचे पती जावेद अख्तर हे नेहमी चर्चेत असतात. दोघंही मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहेत. तसेच शबाना व जावेद त्यांची अनेक विषयांवरची मतंदेखील परखडपणे मांडताना दिसतात. त्यांचे लग्न हे संगळ्यांसाठीच धक्कादायक होते. मात्र त्यांच्या लग्नाबद्दलचा खुलासा अभिनेता अन्नू कपूर यांनी केला आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये शबाना व जावेद यांच्या लग्नंबद्दल खुलासा केला आहे. या लग्नामध्ये अन्नू यांचा नक्की काय सहभाग होता? तसेच कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागले होते याबद्दल अन्नू यांनी दिलखुलासपणे भाष्य केले आहे. (annu kapoor on shabana azmi and javed akhtar marriage)
अन्नू यांनी सांगितले की, “जावेद नशेमध्ये होते. शबाना दुसरीकडे बसून पुस्तक वाचत होती. मी पण तिथेच होतो. त्यांना म्हणालो की पुढे व्हा विचार करा आणि एकदाच निर्णय घ्या. त्यावेळी जावेद खूप नशेत होते. मात्र शबानाने इतका मोठा निर्णय कसा घेणार? असा प्रश्नदेखील उपस्थित केला. नंतर मी पुन्हा जावेद यांच्याकडे गेलो आणि समजावलं आणि त्यांनी लग्नाला तयार असल्याचे सांगितले”.
त्यानंतर ते म्हणाले की, “मी जावेद यांचा ड्रायव्हर मायकलबरोबर मौलवी यांना आणण्यासाठी वांद्रे मस्जिदकडे गेलो. यावेळी शौकत अम्मीने लाल रंगाचा लहंगा दिला आणि अनिल कपूर व बोनी कपूर यांना फोन केल्यानंतर सगळे आले”.
पुढे त्यांनी सांगितले की, “त्या रात्री आम्ही चार वाजेपर्यंत फिरत राहिलो. त्यांचे लग्न अर्ध्या रात्री पार पडलं. जावेद व शबाना यांचे लग्न लक्षात राहणारे आहे”. ‘कर्ली टेल्स’बरोबरच्या मुलाखतीमध्ये शबाना यांनी सांगितले की, “लग्नाच्या वेळी खूप कठीण परिस्थिती होती. तीन वेळा मी ब्रेकअप करण्याचा प्रयत्न केला पण झाला नाही. जावेद यांची मुलंदेखील होती. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं होतं”.