Ankita Walavalkar Answers To Netizens : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष गाजताना दिसलं. यंदाच्या या पर्वातील सगळेच स्पर्धक चर्चेत राहिले. ‘बिग बॉस मराठी’ आता संपलं असलं तरी ही स्पर्धक मंडळी चर्चेत असलेली पाहायला मिळत आहेत. यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीचा बहुमान हा सूरज चव्हाणने पटकवला. यंदाच्या या पर्वात रील स्टारने धुमाकूळ घातला. ‘बिग बॉस’ संपल्यानंतर घरी परतल्यानंतर स्पर्धकांचं जंगी स्वागत करण्यात आलं. अशातच kokanhearted गर्ल अंकिता वालावलकर विशेष चर्चेत राहिली. अंकिता ही मूळची कोकणातील असून आता सध्या ती तिच्या गावी कोकणात गेली आहे.
कोकणात जाताच अंकिताचं कोकणवासियांनी जंगी स्वागत केलं नाही म्हणून तिला डिवचलं असल्याचं समोर आलं आहे. एका नेटकऱ्याने थेट कमेंट करत कोकणात तुझं स्वागत केलं नाही याबाबत अंकिताला सवाल केला. या नेटकऱ्याच्या प्रश्नावर अंकिताने सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. अंकिता सध्या तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह तिच्या गावी मालवणला गेली आहे. कोकणात जातानाचे अनेक व्हिडीओ देखील तिने पोस्ट केले आहेत.
आणखी वाचा – रणबीर कपूर पापाराझींवर ओरडताच आलिया घाबरली, पार्टीतून बाहेर आल्यावर घडला ‘हा’ प्रकार, नेमकं काय झालं?
यानंतर नेटकऱ्याने कोकणातील स्वागतावरुन डिवचताच अंकिताने नेटकऱ्याची कमेंट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला पोस्ट करत सडेतोड उत्तर दिलं आहे.”कोकणात गावी गेली ही मुलगी पण कोणीही या मुलीचे स्वागत केले नाही यावरुन कळते की, किती kokanhearted मुलगी आहे”, असं नेटकऱ्याने म्हटलं आहे. ‘बिग बॉस’मधील इतर स्पर्धकांचे त्यांच्या गावी धुमधडाक्यात, जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र kokanhearted गर्ल म्हणून कोकणची असलेल्या अंकिताच कोकणात स्वागत झालं नाही.
नेटकऱ्याने केलेल्या या प्रश्नाचं उत्तर देत अंकिता म्हणाली, “मला रॅली वगैरे आवडत नाही, पोस्टरबाजीही आवडत नाही. या गोष्टी टाळण्यासाठी मी स्वतः उशिरा गावाकडे आले. मला अनेक फोन आले त्या सगळ्यांना मी सांगितलं की मला कोणतेही मोठे कार्यक्रम नको आहेत. त्यामुळे उगीच काही नकारात्मक बोलण्यापेक्षा स्वतःवर लक्ष द्या”. ही कमेंट स्टोरीला पोस्ट करत तिने “परबीनिक त्रास झालो”, असा मालवणी भाषेत टोमणाही नेटकऱ्याला दिला आहे.