बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन ही नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. ८०-९० च्या काळामध्ये रविनाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ती व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेदेखील अधिक चर्चेत राहिली आहे. अभिनेता अक्षय कुमारबरोबरच्या तिच्या अफेअर्सच्या चर्चा खूपरंगल्या होत्या. १९९० मध्ये दोघांचाही साखरपुडा झाला होता. लग्नबंधनातदेखील अडकणार होते मात्र त्यांचा ब्रेकअप झाला. यानंतर तिचे नाव अजय देवगणबरोबरदेखील जोडले होते. अजयच्या प्रेमात असताना तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही म्हंटले गेले. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे अजयने स्वतः स्पष्ट केले होते. अशातच तिचे नाव नंतर सैफ अली खानबरोबर जोडले गेले होते. (amrita singh on raveena tondon)
रविना व सैफ यांनी ‘इम्तेहान’, ‘मै खिलाडी तू अनाडी’, ‘किंमत’, ‘परंपरा’ व ‘पहला नशा’ या चित्रपटांमध्ये एकत्रित काम केले आहे. या चित्रपटांमध्ये काम करताना त्यांचे नाव एकमेकांबरोबर जोडले होते. यामुळे सैची पत्नी अमृता सिंह चांगलीच भडकली होती. ९० च्या दशकातील ‘सिनेब्लिट्स’ या मॅगझीनला मुलाखत देताना तिने तिचा रंग व्यक्त केला होता तसेच शिव्यादेखील दिल्या होत्या.
अमृता म्हणाली की, “रविना खूप तुसडी व चीडचिडी आहे. ती आणि मी कधीही मैत्रिणी झालो नाही. माझा नवरा सैफ व रविनाचे अफेअर. खरच तुम्ही सीरियस आहात? मी तर म्हणेन की सैफ जास्त बुद्धिमान व राजबिंडा आहे. रविनापेक्षा सैफची निवड अधिक चांगली आहे”.
पुढे ती म्हणाली की, “जेव्हा मी नाशिकला एकत्र होतो तेव्हा रविना माझ्याबरोबर अजिबात बोलली नव्हती. माझ्याशी कोणी बोलत नसेल तर ही समोरच्याची समस्या आहे. मी स्वतः रविना सारख्यांबरोबर बोलेन असं कधीही होणार नाही. मी आणि रविना कधीही एकसारख्या होऊ शकत नाही”. दरम्यान अमृताच्या या मुलाखतीने खूप खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, यामुळे रविना अधिक दु:खी झाली होती. अमृताच्या या गोष्टी ऐकून तिला खूप आश्चर्यदेखील वाटले होते.