बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी सध्या खूप चर्चेत असलेली बघायला मिळत आहे. जुलै २०२२ मध्ये ती रेसलर संग्राम सिंहबरोबर लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर अनेकदा ती वादांमुळेही चर्चेत राहिली आहे. भांडणाचे अनेक व्हिडीओदेखील तिने युट्यूबवर शेअर केला होता. ज्यामुळे ती अधिक चर्चेत आली होती. संग्रामबरोबर लग्न करण्याआधी ती राहुल महाजनबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. मात्र त्यांच्यामध्येही अनेक वाद झाल्याचे दिसून आले होते. सोशल मीडियावर त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली होती. अशातच तिची एक मुलाखत आता समोर आली आहे. ज्यामध्ये पायल राहुलबरोबरच्या नात्याबद्दल सांगताना दिसत आहे. ती नक्की काय म्हणाली? हे आपण आता जाणून घेऊया. (payal rohatagi on rahul mahajan )
पायलने राहुलवर मारहाणीचे आरोप केले होते. ‘बिग बॉस २’ नंतर दोघांनी एकमेकांना डेट केले होते. दोघांचंही नातं खूपच चर्चेत राहिलेले दिसून आले. पायलने अनेकदा राहुलवर हिंसक होण्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. याबद्दल पायलने ‘बॉलिवूड शादीज्’बरोबर संवाद साधला. ती म्हणाली की, “राहुलने मला दोन वेळा मारलं. एकदा तर माझे डोकं त्याने दरवाजावर आपटलं होतं. जेव्हा राहुल खूप रागात असायचा तेव्हा त्याचा स्वतःवर ताबा राहायचा नाही”.
तसेच राहुलने डिंपी गांगुलीबरोबर लग्न केले होते. बायकोने राहुलवर घरगुती हिंसेचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. याबद्दलही पायलने सांगितले होते. ती म्हणाली की, “जेव्हा मी याआधी डींपी व राहुल यांच्याबद्दल बोललो तेव्हा डिंपीने हे सगळं नाकारलं होतं. ती म्हणाली की आमच्यामध्ये सगळं सुरळीत सुरु आहे”.
पुढे ती म्हणाली की, “पण दुसऱ्या दिवशी बातमी आली की राहुल डिंपीला मारतो. यावरुनच त्या दोघांमध्ये किती चांगलं सुरु नव्हतं हे समजून आलं आहे”. दरम्यान पायलच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती याआधी कंगना रणौतच्या लॉकअपमध्ये दिसून आली होती. या शोची उपविजेती ठरली होती.