Shiva Rajkumar Cancer Free : कन्नड अभिनेता आणि निर्माता शिवा राजकुमार यांच्या आजारपणाबाबत खूप मोठी अपडेट समोर आली आहे. शिवा राजकुमार हे अभिनेते अनेक दिवसांपासून मूत्राशयाच्या कर्करोगाने त्रस्त होते. यानंतर आता ते कर्करोगमुक्त झाले असल्याचं समोर आलं आहे. शिवा राजकुमारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या तब्येतीबाबत अपडेट शेअर केली आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये केमोमुळे त्याचे केस गळले आहेत आणि तो खूप अशक्त झाला असल्याचं दिसत आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे शिवा राजकुमारने आता कॅन्सरशी लढाई जिंकली आहे.
६२ वर्षीय अभिनेत्याने व्हिडीओद्वारे आपला भावनिक प्रवास शेअर केला आणि आरोग्याबाबत अपडेट देत सांगितले की, मियामीमध्ये मूत्राशयाच्या कर्करोगावर उपचार सुरु आहेत. तेथे डॉक्टरांनी त्याचे मूत्राशय काढून दुसरे मूत्राशय बसवले आहे. व्हिडीओमध्ये शिवा राजकुमारने सांगितले की, “तो खूप घाबरला होता, पण चाहते, नातेवाईक आणि डॉक्टरांच्या पाठिंब्याने तो मजबूत झाला”. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, मियामीला उपचारासाठी जात असतानाही तो खूप घाबरला होता. पण पत्नी आणि कुटुंबीयांनी त्याची खूप काळजी घेतली.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायक अरमान मलिकचं थाटामाटात लग्न, शाही विवाहसोहळ्याचा पहिला फोटो समोर, लूकची जोरदार चर्चा
शिवा राजकुमार यांनी सांगितले की, त्यांच्या किडनीचे मूत्राशय काढून दुसरे मूत्राशय बसवण्यात आले आहे. याशिवाय त्यांची केमोथेरपीही झाली. डॉक्टरांनी आता अभिनेत्याला आणखी एक महिना विश्रांती आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तब्येत ठीक झाल्यानंतर शिवा राजकुमारने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले. तसेच त्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि तो लवकरच दमदार पुनरागमन करेल असे सांगितले.
शिवा राजकुमार यांच्यावर डिसेंबरमध्ये कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मियामी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शिवा राजकुमार हा दिवंगत कन्नड स्टार पुनीत राजकुमारचा मोठा भाऊ असल्याची माहिती आहे. अभिनेता कॅन्सरमुक्त झाल्याचे जाणून चाहत्यांनाही प्रचंड आनंद झाला आहे.