टेलिव्हिजनवरील ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ हा शो अधिक चर्चेत राहिला आहे. या कार्यक्रमाने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेतील अनेक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. त्यातील एक महत्त्वाची भूमिका म्हणजे पिंकी बुआ. पिंकी बुआची भूमिका अभिनेत्री उपासना सिंहने साकारली होती. मात्र काही दिवसांनंतर उपासना या कार्यक्रमातून बाहेर पडली. याबद्दल उपासनाने कार्यक्रमातून बाहेर पडल्याबद्दलचा एक खुलासा केला आहे. ज्याकडे आता सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. उपासना नुकतीच एका मुलाखतीमध्ये उपस्थित राहिली होती. यावेळी तिने या सगळ्याबद्दलचा खुलासा तिने केला असून तिच्याबद्दल घडलेल्या सगळ्या प्रसंगाबद्दल तिने सांगितले आहे. (upasna singh on comedy night with kapil)
उपासना सिद्धार्थ कननच्या मुलाखतीमध्ये उपस्थित राहिली होती. यावेळी तिने कपिल शर्मा व कृष्णा अभिषेक यांच्या भांडणामध्ये अडकल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली की, “२८ वर्ष आमचा कार्यक्रम पहिल्या नंबरवर राहिला आहे. असे खूप कमी शो बघायला मिळतात. अशी एक वेळ आली होती जेव्हा माझ्याकडे काहीच काम नव्हते. मी कपिलादेखील सांगिले होते. माझं व कपिलचं नातं खूप चांगलं आहे. कोणतेही भांडण नाही. अनेक जण म्हणाले की मी भांडणामुळे कार्यक्रम सोडला आहे”.
उपासना पुढे म्हणाली की, “कार्यक्रम जसा आधी चांगला होता तसा आता राहिला नाही असंही मी कपिलला म्हणाले. मी अनेकदा माझ्या भूमिकेवर लक्षदेखील द्यायला सांगितले. तेव्हा कपिल चित्रपटासाठी तयारी करत होता. या सगळ्यातून बाहेर जाईन तेव्हा सगळ्याकडे लक्ष देइन असंही तो म्हणायचा. मध्यंतरी कपिलचे ‘कलर्स वाहिनी’बरोबर वाद झाले होत. माझा करार ‘कलर्स’ बरोबर होता. कपिल व त्याच्या टीमबरोबर माझे काहीही देणंघेणं नव्हतं”.
पुढे तिने सांगितले की, “जेव्हा हे सगळेजण ‘सोनी’ वाहिनीकडे गेले तेव्हा ‘कलर्स’ने मला सांगितले की आमच्याबरोबर तुमचा करार आहे. त्यामुळे कृष्णाचा जो शो आहे तोपर्यंत तुम्ही करा. त्यामुळे आता दोन टीम तयार झाल्या होत्या. त्यामुळे तिथे काम करणं मला जमलं नाही. कपिल व कृष्णा यांच्यामध्ये तणाव होता. बोलणं खूप कमी झालं होतं”.
उपासना पुढे म्हणाली की, “मला खूप त्रास झाला. अशा अनेक गोष्टी झाल्या आणि कपिल मला म्हणाला की माझ्या कार्यक्रमात ये. पण निर्माती म्हणून मी दोन पंजाबी चित्रपटांचे काम सुरु केले होते. माझ्या एका चित्रपटात कपिलने आवाजदेखील दिला आहे. मी कामामुळे खुश नव्हते त्यामुळे मी कार्यक्रमात काम करणार नाही. असं मी सांगितलं”. उपासनाची ही मुलाखत सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.