बॉलिवूड कलकारांनी सरत्या वर्षाला निरोप देत मोठ्या उत्साहात नवीन वर्षांचे स्वागत केले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने एंजॉय करताना दिसला. नेहमी वेगवेगळ्या कारणांवरुन चर्चेत असलेली टेलिव्हिजन व बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मौनी पती सूरज नांबीयार व खास मैत्रीण दिशा पटानीबरोबर नवीन वर्षांच्या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. मात्र पार्टीमधून बाहेर पडताना मौनीबरोबर धक्कादायक प्रकार घडला आहे ज्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र तिची चर्चा सुरु आहे. मौनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नक्की काय आहे? त्याबद्दल आपण जाणून घेऊया. (mouni roy viral video)
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मौनी तिचा पती सूरज व मैत्रीण दिशाबरोबर दिसून येत आहे. पार्टी झाल्यानंतर ती बाहेर येत असताना पायऱ्यांवर अचानक तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते. ती पडल्यानंतर तिचा पती लगेचच तिला उचलतो व दिशादेखील तिला सांभाळते. मौनीला दुखापत झाल्याचे तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते. मौनीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिला जास्त लागलं नसल्याची आशा चाहते व्यक्त करत आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी तिची खिल्लीदेखील उडवली आहे.
एका नेटकऱ्याने लिहिले की, “फॅशनचा पोपट झाला”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “झेपत नाही तर इतकी का प्यावी?”, तसेच अजून एकाने लिहिले की, “प्यायल्यावर माणूस पडतोच”. त्यामुळे अनेकांनी मौनी नशेमध्ये असल्याचे म्हंटले आहे. मौनीला सोशल मीडियावरील तिच्या फोटो किंवा व्हिडीओमुळे ट्रोल करण्यात आल्याची ही पहिली वेळ नसून हे याआधीही मौनीला तिच्या बोल्ड लुकमधील फोटो व व्हिडीओमुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
मौनीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ती आता ‘सलाकार’मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फारूक कबीर करणार आहे. याशिवाय ती अहमद खानच्या ‘वेलकम टू द जंगल’ मध्ये दिसून येणार आहे. त्याचप्रमाणे मोहित सूरीच्या ‘मलंग २’ मध्येही दिसून येणार आहे.