नव्वदीच्या दशकातील ‘आशिकी’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. या चित्रपटातील सर्व गाणी अक्षरश: रातोरात प्रसिद्ध झाली होती. या चित्रपटातील मुख्य भूमिका सकारणारी अभिनेत्री म्हणजे अनु अग्रवाल. चित्रपट प्रदर्शनानंतर तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते निर्माण झाले. मात्र अनु यांच्याबरोबर एक धक्कादायक प्रसंग घडला आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. एका भयंकर अपघातामध्ये त्यांचा जीव वाचला मात्र चेहरा पूर्ण बिघडला. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये याबद्दल सांगितले आहे. मात्र हिंमत न हरता त्या पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहिल्या. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ बघायला मिळतात. मात्र त्यांच्या एका नवीन व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (anu aggarwal dance video)
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अनु यांनी एक डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात टीका करताना दिसत आहेत. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान ड्रेस परिधान केला आहे. तसेच त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत, “जबरदस्त पार्टी, खूप मेहनत आणि ध्यान हेच माझे लक्ष्य आहे” असं लिहिले आहे. कॅप्शन प्रेरणादायी असलं तरीही त्यांचा डान्स व कपडे लोकांना आवडले नाहीत. अनेकांनी प्रतिक्रिया देत त्यांना ट्रोल केले आहे.
अनु यांच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्याने लिहिले की, “किती फालतू आहे हे. अनु कृपया तुम्ही तुमचा दर्जा राखा”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “तुम्ही आम्हाला ‘आशिकी’मध्ये आवडला होतात. ते वाया नका घालवू”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “इतका घाणेरडा डान्स का करत आहात?, तसेच एका नेटकऱ्याने लिहिले की, “हे १९९० नाही तर २०२४ आहे. कधी तुम्ही मोठ्या होणार आणि लहान मुलांचे फ्रॉक घालणं बंद करणार?”. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सन १९९९ साली अनु यांचा अपघात झालं तेव्हा त्या २९ दिवस कोमात होत्या तसेच चेहरा पूर्णपणे बिघडला होता. हा अपघात इतका भयंकर होता की त्यांची स्मरणशक्तीदेखील गेली होती. याबद्दल त्यांनी अनेकदा माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.