शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नवीन वर्षाच्या जंगी पार्टीनंतर मौनी रॉयचा तोल सुटला, पायऱ्यांवरुन खाली कोसळली अन्…; नेटकऱ्यांनी साधला निशाणा, म्हणाले, “झेपत नाही तर…”

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 1, 2025 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mouni roy viral video

नवीन वर्षाची पार्टी करुन परतताना मौनी रॉय धडपडली

बॉलिवूड कलकारांनी सरत्या वर्षाला निरोप देत मोठ्या उत्साहात नवीन वर्षांचे स्वागत केले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने एंजॉय करताना दिसला. नेहमी वेगवेगळ्या कारणांवरुन चर्चेत असलेली टेलिव्हिजन व बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मौनी पती सूरज नांबीयार व खास मैत्रीण दिशा पटानीबरोबर नवीन वर्षांच्या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. मात्र पार्टीमधून बाहेर पडताना मौनीबरोबर धक्कादायक प्रकार घडला आहे ज्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र तिची चर्चा सुरु आहे. मौनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नक्की काय आहे? त्याबद्दल आपण जाणून घेऊया. (mouni roy viral video)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मौनी तिचा पती सूरज व मैत्रीण दिशाबरोबर दिसून येत आहे. पार्टी झाल्यानंतर ती बाहेर येत असताना पायऱ्यांवर अचानक तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते. ती पडल्यानंतर तिचा पती लगेचच तिला उचलतो व दिशादेखील तिला सांभाळते. मौनीला दुखापत झाल्याचे तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते. मौनीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिला जास्त लागलं नसल्याची आशा चाहते व्यक्त करत आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी तिची खिल्लीदेखील उडवली आहे.

आणखी वाचा – बायकोच्या वाढदिवसानिमित्त हटके शुभेच्छा देत हेमंत ढोमेने व्यक्त केलं प्रेम, म्हणाला, “पाटलीणबाई आज तुमचा जन्म झाला नसता तर…”

View this post on Instagram

A post shared by Saalim Hussain Rizvi (@saalim_hussain110)

एका नेटकऱ्याने लिहिले की, “फॅशनचा पोपट झाला”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “झेपत नाही तर इतकी का प्यावी?”, तसेच अजून एकाने लिहिले की, “प्यायल्यावर माणूस पडतोच”. त्यामुळे अनेकांनी मौनी नशेमध्ये असल्याचे म्हंटले आहे. मौनीला सोशल मीडियावरील तिच्या फोटो किंवा व्हिडीओमुळे ट्रोल करण्यात आल्याची ही पहिली वेळ नसून  हे याआधीही मौनीला तिच्या बोल्ड लुकमधील फोटो व व्हिडीओमुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

आणखी वाचा – रणबीर कपूरचं कुटुंबासहित नवीन वर्षांचं जंगी सेलिब्रेशन, राहाच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

मौनीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ती आता ‘सलाकार’मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फारूक कबीर करणार आहे. याशिवाय ती अहमद खानच्या ‘वेलकम टू द जंगल’ मध्ये दिसून येणार आहे. त्याचप्रमाणे मोहित सूरीच्या ‘मलंग २’ मध्येही दिसून येणार आहे.  

Tags: mouni roynew year partyviral video
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
anu aggarwal dance video

सुप्रसिद्ध 'आशिकी' चित्रपटातील अभिनेत्रीचा विचित्र डान्स पाहून चाहते संतापले, प्रतिक्रिया देत म्हणाले, "किती फालतू..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.