सयाजी शिंदे हे मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी आजवर हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका सकारल्या आहेत. आता त्यांच्याबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. त्यामुळे आता सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. सायाजी यांच्या राजकारणातील पक्षप्रवेशाने त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. (Sayaji Shinde joins Ajit Pawar NCP)
सयाजी यांनी अभिनयाबरोबरच समाजकार्यामध्येही महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी स्वतः पुढे येत त्याने अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे. त्यांनी निर्माण केलेल्या सह्याद्री देवराईचं कौतुक केले जात आहे. पण त्यांच्या आता राजकारणातील प्रवेशामुळे पक्षालादेखील फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान सायाजी यांचे स्वागत छगन भुजबळ यांनी केले आहे. ते म्हणाले की, “उद्या दसरा आहे. आज आम्हाला दसरा एक दिवस आधीच साजरा करण्याचं भाग्य लाभलं आहे. पण सयाजी हे मराठी असले तरीही त्यांनी दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रांमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे”.
पुढे ते म्हणाले की, “सयाजी यांनी लोकांचं खूप मनोरंजन केले आहे. पण त्यांनी तळागाळातल्या लोकांचेही कल्याण त्यांनी केले आहे”. दरम्यान त्यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे ते काय काम करणार? तसेच आता गावागावातील लोकांचा किती आणि कसा विकास होणार? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत सयाची शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते. सयाजी शिंदे यांचं सामाजिक क्षेत्रात चांगल काम आहे. त्यामुळे आम्ही आज आमच्या सोबत त्यांना घेत आहोत, अशी प्रतिक्रिया प्रवेशावेळी सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे.