Made In Heaven Actor Arjun Mathur Marriage : प्रसिद्ध वेब सीरिज ‘मेड इन हेवन’ मधील अभिनेता अर्जुन माथूरने त्याची गर्लफ्रेंड टिया तेजपालबरोबर लग्न केलं असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्याने अधिकृतपणे त्याच्या लग्नाची घोषणा केली नसली तरी वधू व वर म्हणून दोघांचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या या फोटोमध्ये अर्जुन व टिया लग्नाच्या पारंपरिक पोशाखात पवित्र अग्निशेजारी मंडपात बसलेले दिसत आहेत. अर्जुन व टिया यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. अर्जुन व टियाच्या समोर आलेल्या लग्नाच्या फोटोंमध्ये हे जोडपे एकमेकांकडे बघून हसताना दिसत आहेत.
दरम्यान या फोटोच्या पार्श्वभूमीत झेंडूच्या फुलांनी सजवलेला विवाह मंडप पाहायला मिळतोय. “‘मेड इन हेवन’ फेम अर्जुन माथूरचे आज लग्न झाले” अशा कॅप्शनसह गुरुवारी संध्याकाळी रेडिटवर हा फोटो शेअर करण्यात आला. अर्जुन माथूरच्या साध्या लग्नाचे चाहते भरभरुन कौतुक करत आहेत. यावेळी एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे की, “सुंदर फोटो”. शोमध्ये भव्य विवाहसोहळ्यांचे नियोजन केल्यानंतरही, त्याला हे माहित आहे की, सौंदर्य हे साधेपणामध्ये आहे. एकाने लिहिले आहे की, “अर्जुनचं लग्न पाहून खूप आनंद झाला. तो खूप छान दिसत आहे. त्याचा आनंद स्पष्ट दिसतोय”.
अर्जुनची पत्नी टिया तेजपाल एक प्रॉडक्शन डिझायनर आहे. जिने अनेक वर्षांमध्ये अनेक चित्रपट व टीव्ही शोमध्ये काम केले आहे. पत्रकार तरुण तेजपाल यांची मुलगी टियाने ‘द व्हाइट टायगर’, ‘रमन राघव 2.0’ आणि ‘कारवां’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. तिने यापूर्वी ‘लाइफ ऑफ पाय’ वर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते परंतु नंतर ती प्रॉडक्शन डिझाइनकडे वळली. टिया व अर्जुन अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, त्याने कधीही आपल्या नात्याबद्दल कोणताच खुलासा केला नाही.
आणखी वाचा – रतन टाटा यांचं संपूर्ण आयुष्य चित्रपटातून पाहायला मिळणार, झीद्वारे मोठी घोषणा, बायोपिकमधून उलघडणार प्रवास
अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे नेहमीच टाळले आहे. प्राइम व्हिडीओच्या ‘मेड इन हेवन’ मधील करणच्या भूमिकेसाठी अर्जुन प्रसिद्ध आहे. तो ‘माय नेम इज खान’, ‘लक बाय चान्स’, ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ आणि ‘ब्रिज मोहन अमर’ यासह अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये दिसला आहे.