‘बिग बॉस १८’ सध्या खूपच चर्चेत आहे. या पर्वाचा पहिला आठवडा मोठ्या उत्साहात पार पडला. तसेच या पर्वातील पहिले नॉमिनेशनदेखील पार पडणार असून यामध्ये चाहत पांडे, मुस्कान बामणे, गुणरत्न सदावर्ते, करणवीर मेहरा व अविनाश मेहरा हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता यामधून कोणता सदस्य घराबाहेर पडणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच आता वीकेंड का वारमध्ये ‘तांडव की रात’ देखील पार पडणार आहे. यामध्ये सलमान खानबरोबरच मल्लिका शेरावत, तृप्ती डिमरी व राज कुमार यांच्याबरोबरच ‘लाफ्टर शेफ’मधील कलाकारदेखील दिसून येणार आहेत. भारती सिंह, कृष्णा अभिषेक व सुदेश लहरीदेखील दिसून येणार आहेत. (bigg boss weekend ka vaar)
पण यावेळी सलमान कोणत्या सडस्याची शाळा घेणार व कोणत्या मुद्यांवर चर्चा होणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कदाचित शाहजादा धामी याची शाळा सलमान घेऊ शकतो. त्याने चुम दारांगच्या नावाची मस्करी केली होती व त्यावर प्रतिक्रियादेखील दिल्या होत्या. त्यावरुन सलमान शाहजादाची शाळा घेऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तसेच एलिमिनेशनबद्दल सांगायचं झालं तर, ‘वीकेंड का वार’मधून एका सदस्याला बाहेर पडावे लागू शकते. यामध्ये मुस्कान बामणेचं नाव घेतलं जात आहे मात्र यावर अजून शिक्कामोर्तब झाले नाही.मुस्कान या घरात येऊन एक आठवडा झाला आहे. ती आजवर घरातील सडस्यांमध्ये मिसळू शकली नाही. तसेच ती जास्त कोणाबरोबर बोलतदेखील नाही. नुकत्याच काही भागांमध्ये ती रडतानादेखील दिसली होती.
त्यानंतर तिने एकटं वाटत असल्याचेही सांगितले होते. सोशल मिडियावरदेखील अनेक जण मुस्कान बाहेर जाणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान आता घरातून कोण बाहेर पडणार? याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जात आहे. पण खरच कोणी बाहेर जाणार की त्यामध्ये नवीन काही ट्विस्ट येणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.