आपल्या रॉक, पॉप आणि रॅप गाण्यांवर तरुणाईला थिरकायला भाग पाडणारा गायक, संगीतकार व रॅपर म्हणजे यो यो हनी सिंह. हनी सिंह याने मोठा काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे हनी सिंहचा सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग आहे. आजवर त्याने अनेक धमाकेदार गाणी देत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ज्या गाण्याची आजही प्रेक्षकांवरील मोहिनी कायम आहे. ‘ब्रॉउन रंग’, ‘देसी कलाकार’, ‘सनी सनी’, ‘ब्ल्यू आईज्’, ‘मनाली ट्रान्स’ अशा अनेक लोकप्रिय गाण्यांनी हनी सिंहने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. मात्र गेले अनेक वर्ष तो मनोरंजन क्षेत्रापासून दूर होता. त्याचे आता कमबॅक झालेलं दिसून येत आहे. (honey singh documentary)
काही दिवसांपूर्वी हनीने पॅराडॉक्सबरोबर तयार केलेलं ‘पायल’ हे गाणं अधिक चर्चेत राहिले. यामध्ये नोरा फतेहीचा जबरदस्त डान्सदेखील बघायला मिळत आहे. त्याचा हा कमबॅक चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी जागा तयार केल्यानंतर हनी काही काळासाठी पूर्णपणे गायब झाला होता. नशेची लत सोडवण्यासाठी तो उपचार घेत असल्याचे त्याने अनेक मुलाखतींमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे.
अशातच आता त्याच्यावर एक डॉक्युमेंट्री येणार आहे. ‘यो यो हनी सिंह : फेमस’ असे या डॉक्युमेंट्रीचे नाव असणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने या डॉक्युमेंट्रीची घोषणा केली आहे. यामध्ये हनी सिंहचे आतापर्यंत संपूर्ण आयुष्य दाखवण्यात येणार आहे. २० डिसेंबर रोजी ही डॉक्युमेंट्री प्रसारित केली जाणार आहे. निर्मात्यांनी पोस्ट करत लिहिले की, “नाव तुम्हाला माहीत आहे पण त्याची गोष्ट तुम्हाला माहीत नाही. अशाच एका दिग्गजाची गोष्ट जाणून घ्या. याने भारतीय संगीताचा चेहरा बदलला आहे. २० डिसेंबर रोजी ‘यो यो हनी सिंह:फेमस’ बघा. फक्त नेटफ्लिक्सवर”.
यामध्ये हनी सिंहच्या आयुष्यातील काही माहीत नसलेल्या बाजू दाखवण्यात येणार आहेत. नेहमी चर्चेत असणाऱ्या गायकाचे आयुष्य नक्की कसे होते? हे यामध्ये तुम्ही जाणून घेऊ शकता. याची निर्मिती गुनीत मोंगा व अचीन जैन यांनी केले आहे. त्यांना ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ साठी ऑस्कर अवॉर्डदेखील मिळाला आहे. रौनक बजाज सहनिर्माता असून एडीटिंगचे काम दीपा भाटीया यांनी केले आहे.