शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पंजाबी-हिंदी रॅपर हनी सिंहच्या आयुष्यावर येणार डॉक्युमेंट्री, या ओटीटी चॅनलवर लवकरच पाहता येणार, चाहते उत्सुक

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 7, 2024 | 4:54 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
honey singh documentary

हनी सिंहची डॉक्युमेंट्री लवकरच येणार

आपल्या रॉक, पॉप आणि रॅप गाण्यांवर तरुणाईला थिरकायला भाग पाडणारा गायक, संगीतकार व रॅपर म्हणजे यो यो हनी सिंह. हनी सिंह याने मोठा काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे हनी सिंहचा सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग आहे. आजवर त्याने अनेक धमाकेदार गाणी देत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ज्या गाण्याची आजही प्रेक्षकांवरील मोहिनी कायम आहे. ‘ब्रॉउन रंग’, ‘देसी कलाकार’, ‘सनी सनी’, ‘ब्ल्यू आईज्’, ‘मनाली ट्रान्स’ अशा अनेक लोकप्रिय गाण्यांनी हनी सिंहने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. मात्र गेले अनेक वर्ष तो मनोरंजन क्षेत्रापासून दूर होता. त्याचे आता कमबॅक झालेलं दिसून येत आहे. (honey singh documentary)

काही दिवसांपूर्वी हनीने पॅराडॉक्सबरोबर तयार केलेलं ‘पायल’ हे गाणं अधिक चर्चेत राहिले. यामध्ये नोरा फतेहीचा जबरदस्त डान्सदेखील बघायला मिळत आहे. त्याचा हा कमबॅक चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी जागा तयार केल्यानंतर हनी काही काळासाठी पूर्णपणे गायब झाला होता. नशेची लत सोडवण्यासाठी तो उपचार घेत असल्याचे त्याने अनेक मुलाखतींमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे.

आणखी वाचा – Video : पुन्हा गावामध्ये राबतोय सूरज चव्हाण, सिमेंटच्या गोणी उचलतानाचा व्हिडीओ समोर, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

अशातच आता त्याच्यावर एक डॉक्युमेंट्री येणार आहे. ‘यो यो हनी सिंह : फेमस’ असे या डॉक्युमेंट्रीचे नाव असणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने या डॉक्युमेंट्रीची घोषणा केली आहे. यामध्ये हनी सिंहचे आतापर्यंत संपूर्ण आयुष्य दाखवण्यात येणार आहे. २० डिसेंबर रोजी ही डॉक्युमेंट्री प्रसारित केली जाणार आहे. निर्मात्यांनी पोस्ट करत लिहिले की, “नाव तुम्हाला माहीत आहे पण त्याची गोष्ट तुम्हाला माहीत नाही. अशाच एका दिग्गजाची गोष्ट जाणून घ्या. याने भारतीय संगीताचा चेहरा बदलला आहे. २० डिसेंबर रोजी ‘यो यो हनी सिंह:फेमस’ बघा. फक्त नेटफ्लिक्सवर”.

आणखी वाचा – बहुचर्चित ‘पुष्पा’च्या तिसऱ्या भागात नक्की काय घडणार?, दुसऱ्या भागाचा शेवट पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, अशी असणार कथा

यामध्ये हनी सिंहच्या आयुष्यातील काही माहीत नसलेल्या बाजू दाखवण्यात येणार आहेत. नेहमी चर्चेत असणाऱ्या गायकाचे आयुष्य नक्की कसे होते? हे यामध्ये तुम्ही जाणून घेऊ शकता. याची निर्मिती गुनीत मोंगा व अचीन जैन यांनी केले आहे. त्यांना ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ साठी ऑस्कर अवॉर्डदेखील मिळाला आहे. रौनक बजाज सहनिर्माता असून एडीटिंगचे काम दीपा भाटीया यांनी केले आहे.        

Tags: honey singh documentarynetflixyo yo honey singh
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Shashank Ketkar Video

शशांक केतकरने फिल्मसिटीतील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर BMCने घेतली दखल, म्हणाला, "प्रत्येक कलाकाराला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.